शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, 7 व्या वेतन आयोगासाठी 'वित्तविभागाची लगीनघाई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 16:33 IST

केंद्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2017 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला. त्यानंतर राज्यसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी रेटून धरली.

ठळक मुद्देसर्व सवंर्गातील पदांच्या माहिती संकलनासाठी 24 सप्टेंबर डेडलाइन

गणेश वासनिक अमरावती : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात शासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माहितीचे संकलन सुरू केले आहे. वित्तविभागाने सर्व संवर्गानुसार पदांबाबत अद्ययावत माहिती पाठविण्याचे निर्देश दिले असून, त्याकरिता 24 सप्टेंबर ही डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे.

केंद्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2017 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला. त्यानंतर राज्यसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी रेटून धरली. मध्यंतरी ही मागणी पूर्णत्वास आणण्यासाठी धरणे, आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसेवेतील अधिकारी, कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. त्यानुसार राज्याच्या वित्तविभागाने शासकीय व इतर पात्र अधिकारी, कर्मचाºयांना केंद्र सरकारच्या सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबत शिफारशी करण्यासाठी ‘राज्य वेतन सुधारणा समिती, 2017’ गठित केली. या समितीच्या कामकाजाच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009 या पुस्तिकेतील सर्वच विभागांशी संबंधित माहिती अद्ययावत करण्यासाठी सॉफ्ट कॉपी उपलब्ध करून दिली आहे. तथापि, बहुतांश विभागांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतची आवश्यक ती माहिती वित्त विभागाकडे पाठविली नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांच्या अधिपत्याखाली सर्व संवर्गातील पदांबाबतची माहिती 24 सप्टेंबरपर्यंत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यसेवेतील 25 लाखांवर लाभार्थीराज्यसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध महामंडळे, महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिकांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यास 25 लाखांवर ही संख्या असणार आहे. प्रत्येक विभागनिहाय संवर्गातील पदांबाबतची माहिती पाठविण्याचे निर्देश वित्तविभागाचे सचिव राजीव मित्तल यांनी 17 सप्टेंबर रोजी काढलेल्या पत्राद्वारे स्पष्ट केले, अन्यथा कार्यासन अधिकारी जबाबदार असतील, असे पत्रात नमूद आहे.

राज्यसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत यापूर्वीच घोषणा केली आहे. मात्र, याची अंमलबजावणी करण्यासाठी  शासनाने पुढाकार घेतला आहे. आता येत्या काळात नव्या वेतनश्रेणीनुसार लाभ मिळेल.  - नामदेव गडलिंग, जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, अमरावती. 

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोगMONEYपैसाGovernmentसरकार