शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

नांदगाव नगरपंचायतीत तीन लाखांच्या बिलाचे गौडबंगाल

By admin | Updated: May 3, 2016 00:27 IST

नव्याने स्थापन झालेल्या नांदगाव नगरपंचायतला अवघ्या सहा महिन्यांतच भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून ...

प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे : नियमाला तिलांजलीमनोज मानतकर  नांदगाव खंडेश्वरनव्याने स्थापन झालेल्या नांदगाव नगरपंचायतला अवघ्या सहा महिन्यांतच भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून ३ लाख १० हजारांच्या बोगस बिलांचा प्रश्न विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सादर करून दोषींवर योग्य कारवाईची मागणी केली आहे व शासकीय नियमाला बगल देणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवरसुद्धा तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक सतीश पटेल व संजय पोपळे यांनी केली आहे. २२ एप्रिल रोजी ३ लाख १० हजार रुपयांचे जे बिल लेखापालांकडून मंजूर करण्यात आले, त्यामध्ये अनेक बनावट बिल सादर करून पैसेसुद्धा काढण्यात आले आहेत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना माहिती देवूनसुद्धा मुख्याधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. फार मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे जनतेने सत्तेची धुरा सोपविली तेच सत्ताधारी जनहीत नव्हे, तर स्वहीत साधत जनतेचा अपेक्षाभंग करीत असल्याचा आरोप होत आहे. अनेक समस्यांचा डोंगर नांदगाव वासियांसमोर उभा असताना सत्ताधारी नगरसेवक स्वहीत साधण्यात मशगुल असल्याने नांदगाव वासियांना नागरी सुविधा देण्यात नगरपंचायत अपयशी ठरली आहे. तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पी. पी. सूर्यवंशी मनमानी कारभार करीत असून विरोधी बाकावरील नगरसेवकांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनात येत आहे. तसेच सर्वसाधारण सभेच्या विषयसूचीवर व सभेसमोर स्थायी समितीच्या कार्यवृत्ताचे वाचन करण्यात येत नसून कार्यवृत्त कायम न करता कधी स्वत:च्या अधिकारात मुख्याधिकारीही करीत असल्याचे नगरसेवक सांगतात व नगरपंचायतची सर्वसाधारण सभा दोन महिन्यांपासून एकदा घेणे बंधनकारक असतानासुद्धा दोन महिन्यांचा कालावधी होऊनही अद्याप नोटीस काढण्यात आलेली नाही. मागील सर्वसाधारण सभेबाबतची माहिती मागितली असता अद्याप मागील सभेचे प्रोसिडींग लिहिण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले असल्याने मुख्याधिकारी कर्तव्यात कसूर करीत असल्याचे दिसून येत आहे व त्यामुळे शहर विकासाला आळा बसला आहे. त्यामुळे जनतेच्या पैशावर मौजमजा करून विकास निधीत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर व कर्तव्यात कसूर करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी विरोधी नगरसेवकांकडून होत आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नगरपंचायतमधील भ्रष्टाचाराचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने टोलवल्याने आता जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे नांदगाव वासियांचे लक्ष लागले आहे.