शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धनासाठी सुवर्ण- रजत पदकांची लयलुट

By गणेश वासनिक | Updated: December 11, 2022 17:09 IST

वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धनाचे प्रभावी कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोधेर्य वाढविणे तसेच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासनाने गत दोन वर्षापूर्वी पदके देण्याची योजना आरंभली आहे. 

अमरावती :

वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धनाचे प्रभावी कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोधेर्य वाढविणे तसेच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासनाने गत दोन वर्षापूर्वी पदके देण्याची योजना आरंभली आहे. 

त्यानुसार सन २०१९-२०२० या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहा कार्यप्रकारासाठी २३ जणांना सुवर्ण, रजत पदके  जाहीर करण्यात आली आहे. यात वन, वन्यजीव संरक्षणार्थ वनरक्षक संवर्गातून रूपी मडावी (गडचिरोली), राजू शिंदे (यवतमाळ) यांना सुवर्ण तर विनोद लबडे (ठाणे), प्रज्ञा खरात (औरंगाबाद), सावळा कांबळे (काेल्हापूर) हे रजत पदकाचे मानकरी ठरले. वनपाल संवर्गातून सुजय कोळी (ठाणे), अभिजीत ठाकरे (अमरावती) यांना सुवर्ण, तर शशिकांत मडके (पुणे) यांना रजत पदक जाहीर झाले. वनक्षेत्रपाल संवर्गातून सागर बनसोड (नागपूर) सुवर्ण, सहाय्यक वनसंरक्षक व्यकंट गायकवाड (औरंगाबाद) यांना मरणोत्तर रजत पदकाने सन्मानित केले जाणार आहे. वन आणि वन्यजीव व्यवस्थापन कार्य प्रकारात वनरक्षक युवराज मराठे (ठाणे) सुवर्ण, प्रदीप गदळे (नागपूर) रजत, तर वनपाल संवर्गातून प्रभाकर आनकरी (गडचिरोली) वनपाल, वनक्षेत्रपाल संवर्गातून संतोष थिपे (चंद्रपूर) सुवर्ण आणि सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातून बापू येळे (चंद्रपूर) यांना रजत पदक बहाल केले जाईल.

नाविण्यपूर्ण, विकासात्मक पूरक कार्य प्रकारात एसीएफ संवर्गातून संजय कडू, वनमजूर संवर्गातून निजाम मुलाणी (पुणे) यांना रजत पदक तसेच धाडसी, शौर्य, प्रगती विशिष्ट कार्य प्रकारात वनमजूर संवर्गात धोंडीबा कोकणे (पुणे) सुवर्ण, वाहन स्वच्छक अनिल शेळके (नागपूर) यांना रजत पदक बहाल केले जाणार आहे .

वनउत्पादन कार्य प्रकारात महाराष्ट्र वन विकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संवर्गातून प्रितीश लोणारे (चंद्रपूर बल्लारशाह) सुवर्ण तर, अमोल चव्हाण (मार्खंडा)हे रजत पदकाने सन्मानित केले जातील. वन विस्तार कार्य प्रकारात वनरक्षक संवर्गातून रूपाली राऊत (अमरावती) यांना सुवर्ण तर, वनक्षेत्रपाल संवर्गातून उत्तम पाटील (ठाणे) यांना रजत पदकाने गौरविले जाणार आहे. वनसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे गाेपनीय अहवाल, सचोटी, चारित्र्य, तांत्रिक कार्यक्षमता, बुद्धीमत्ता आणि त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आदींचा विचार करून सुवर्ण, रजत पदकांसाठी निवड केली आहे. प्रधान वनसचिवांच्या अध्यक्षतेत समितीची २३ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत पदकांसाठी नावे निश्चित केली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती