शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सोने ७५ हजार, गुंतवणुकीसाठी ही वेळ योग्य ठरणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:21 IST

Amravati : जिल्ह्यात वर्षभर सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता

मोहन राऊत लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे: यंदा जिल्हाभरात सुरुवातीपासून चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोने खरेदीला जिल्ह्यात वर्षभर चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

अमरावती येथील सराफा बाजारात सोन्याचा दर ७५ हजार, तर चांदी ८९ हजार रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या अनेकांनी सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक चांगला भाव मिळत असल्याने मोडीत काढण्यास सुरुवात केली, तर काही जण भविष्यासाठी गुंतवणूक करीत आहेत. 

५०० रुपयांनी वाढले दहा दिवसांत सोने गेल्या दहा पंधरा दिवसांपूर्वी सोने चांदीचा भाव ५०० रुपयांनी कमी होता. परंतु, आज सोन्याचा भाव ७५ हजार रुपये झाला आहे. म्हणजेच १० दिवसांत ५०० रुपयांची वाढ झाली.

लग्नसराईमुळे आणखी भाव वाढणार सध्या बाजारपेठेत सोने ७५ हजार, तर चांदी ८९ हजार रुपये आहे. परंतु, आगामी एप्रिल-मे महिन्यात लग्नसराईमुळे हे भाव आणखी वाढतील. त्यामुळे अनेकांनी आतापासूनच सोने-चांदी खरेदी करण्यावर भर दिला आहे. 

एका वर्षात ५० टक्के वाढ सध्या सोने - चांदीच्या भावामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे अनेक जण बोलून दाखवत आहेत. वर्षभरात ५० टक्के वाढ झाली.

अनेकांचा खरेदीवर भर "सध्या सणोत्सव सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक सोने-चांदी खरेदी करण्यावर भर देत आहेत. यात विशेषतः वधू-वर पित्यांचा सोने-चांदी खरेदीवर अधिक भर आहे." - मनोज भगत, व्यापारी, धामणगाव रेल्वे

आणखी भाव वाढणार "आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने-चांदीचे दर वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे दरवाढ होत असून, आगामी महिन्यात हे भाव वाढण्याची शक्यता आहे." - संजय वर्मा, व्यापारी, धामणगाव रेल्वे

टॅग्स :GoldसोनंAmravatiअमरावती