शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

जलसंधारणातून गावाच्या कायापालटचे ध्येय ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:47 AM

पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी स्पर्धा हाच उद्देश न ठेवता, जलसंधारणातून गावाचा कायापालट करण्याचे ध्येय ठेवून कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसंदर्भात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी स्पर्धा हाच उद्देश न ठेवता, जलसंधारणातून गावाचा कायापालट करण्याचे ध्येय ठेवून कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मंगळवारी केले. तालुका प्रशासनाने या कामांसाठी भरीव प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.पानी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाकडून धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील सहभागी गावांत कामे सुरू आहेत. स्पर्धेसाठी ३३४ गावांतील प्रतिनिधींनी प्रशिक्षण घेतले आहे. या गावांतील नियोजन व अडचणींबाबत प्रशासन, संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थांची बैठक नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा खत्री, मनपा आयुक्त हेमंत पवार, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिणा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) डी. आर. काळे, भारतीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष सुदर्शन जैन, सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट, बाबासाहेब राऊत, फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक अतुल काळे आदी उपस्थित होते.स्पर्धेत सहभागी गावांत गत पंधरवड्यात जलसंधारणाची कामे सुरू झाली. उर्वरित एका महिन्याच्या कालावधीत कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभाग मिळवत प्रशासनाने जोरदार प्रयत्न करावेत. सहभागी गावांकडून अपेक्षित काम व खचार्बाबत अर्ज येताच उपविभागीय अधिकाºयांनी त्याला तात्काळ मान्यता द्यावी. स्पर्धेचा कालावधी लक्षात घेता कामे गतीने व्हावीत. धारणी व चिखलदरा तालुक्यांतील परिस्थिती लक्षात घेऊन तेथील मजुरांना मनरेगा अंतर्गत वेतन दिले जाईल, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.भारतीय जैन संघटना देणार यंत्रसामग्रीधारणी तालुक्यासाठी खंडवा व बऱ्हाणपूर येथून यंत्रे मागविण्यात आली आहेत. प्रत्येक गावाला जेसीबी, पोकलॅन आदी यंत्रसामग्री पुरविण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या गावात चांगले काम होत असेल, तर केवळ गुणांच्या तांत्रिकतेत न अडकता तिथे यंत्र दिले जाईल, असी ग्वाही भारतीय जैन संघटनेचे सुदर्शन जैन यांनी दिली. गावात झालेल्या प्रत्येक कामाची नोंद अ‍ॅपमध्ये घ्यावी, अशी सूचना उपल्हिाधिकारी काळे यांनी केलीस्पर्धेचा ४५ दिवस राहणार कालावधीवॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून, यंदाचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख रुपये आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक तसेच प्रत्येक तालुक्यातील आघाडीवरील गावाला प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत श्रमदान तसेच यंत्रांच्या साहाय्याने जलसंधारणाद्वारे पाणी साठवण क्षमता निर्माण करणे हा स्पर्धेचा उद्देश आहे.