शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या खरेदीला जाताय, मोबाईल, दुचाकी सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 05:00 IST

पकडले जाऊ नये म्हणून दुचाकीचोरांच्या टोळ्या नंबरप्लेट बदलून, बनावट नंबर टाकून चोरीच्या वाहनांची विक्री करतात. त्यातही पकडले जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनेक जण दुचाकीचे सुटे भाग काढून त्यांची विक्री करीत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. शहराच्या पश्चिम भागात अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण दुचाकीचे पार्ट न पार्ट वेगळे केले जात असल्याची माहितीदेखील आहे.

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर व जिल्ह्यात अलीकडे दुचाकीचोरीचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. आठवड्यातून मोबाईल चोरीच्या घटनादेखील नोंदविल्या जात आहेत. दिवाळीच्या निमित्ताने आता चोरांसाठी सुकाळ आला आहे. अमरावती शहरातील कुठल्याही चौकात, व्यापारी संकुलात वा उड्डाणपुलाखाली दुचाकी सुरक्षित नाही. अगदी दवाखान्याच्या, शासकीय कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला जात असल्याने वाहनधारकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील विविध बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दी असल्यामुळे अनेक जण आपली दुचाकी उड्डाणपुलाखाली ठेवून बिनधास्त शॉपिंग करण्यासाठी जात असल्याचे सारासार चित्र आहे. मात्र, दुचाकी गमवायची नसेल, तर अधिक सजग राहण्याची गरज आहे. शॉपिंग, बाजारहाट होईपर्यंत दुचाकीजवळ कुणीतरी ठेवा किंवा ठेवलेली दुचाकी नजरेच्या टप्प्यात राहावी, ते पाहण्याची गरज आहे. 

दुचाकीचे सुटे पार्ट काढून विक्रीपकडले जाऊ नये म्हणून दुचाकीचोरांच्या टोळ्या नंबरप्लेट बदलून, बनावट नंबर टाकून चोरीच्या वाहनांची विक्री करतात. त्यातही पकडले जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनेक जण दुचाकीचे सुटे भाग काढून त्यांची विक्री करीत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. शहराच्या पश्चिम भागात अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण दुचाकीचे पार्ट न पार्ट वेगळे केले जात असल्याची माहितीदेखील आहे.

ही घ्या काळजीमोबाईल : शक्यतो मोबाईल खालच्या खिशात ठेवा. तो वरच्या खिशात ठेवू नका. मोबाईलवर बोलत बाजारहाट वा अन्य खरेदी करू नका. संशयास्पद व्यक्तीपासून दूरच राहा.दुचाकी : ज्या व्यावसायिक संकुलाकडे हक्काचे पार्किंग स्थळ आहे, तेथेच शक्यतोवर दुचाकी पार्क करा. हॅण्डल लॉक आठवणीने करा. शक्यतो सोबत असलेली व्यक्ती दुचाकीजवळ थांबवून चोरांना संधी देऊ नका. तातडीने पोलिसांशी संपर्क साधा. चोरी गेलेला मोबाईल सापडतो, पण वेळाने. चोरी गेलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याची टक्केवारी ३० ते ४० च्या घरात आहे. त्यामुळे चोरी गेलेला मोबाईल मिळेलच, याबाबत कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. यंदा शहर पोलीस आयुक्तालयाने ४७ लाख रुपयांचे ४५१ मोबाईल मूळ मालकास परत केले. मोबाईल सापडतो, पण वेळाने हे वर्तमानातले अस्वस्थ वास्तव आहे.

 

टॅग्स :MarketबाजारThiefचोर