शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक आरोग्य विभागात ‘लक्ष्मी’ द्या अन्‌ पदोन्नती घ्या !

By गणेश वासनिक | Updated: September 26, 2023 18:21 IST

जेष्ठांना डावलून कनिष्ठांना पदोन्नती, रेटकार्डची चर्चा जोरात

अमरावती : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात 'क्लास वन' आणि 'क्लास टू' मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदांपासून ते संचालक पदांपर्यत जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. त्यामुळे एवढा मोठा 'आरोग्याचा डोलारा' सांभाळणे कठीण जात आहे. हा डोलारा सांभाळण्यासाठी मर्जीतील एका-एका अधिका-याकडे दोन-तीन प्रभार देण्यात आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागात जेष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना डावलून आपल्या मर्जीतील कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदश्रेणी अवनत करुन उच्च पदावर तात्पुरत्या पदोन्नती दिलेल्या आहेत. याकरीता अनुभव, शैक्षणिक पात्रता, जेष्ठता गौण ठरविण्यात आलेली आहे. सेवानिवृत्तीच्या जवळ आलेले जेष्ठ अधिकारी मात्र नाईलाजाने कनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करीत आहे. असे 'विचित्र' चित्र सार्वजनिक आरोग्य विभागात दिसत आहे. पदश्रेणी अवनत करुन पदोन्नती दिलेल्या कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या ३५ ते ४० आहे. तर यात जवळपास अडीचशे जेष्ठ अधिका-यांना डावलण्यात आले आहे.

कसे आहे पदांसाठीचे रेट कार्ड?

सार्वजनिक आरोग्य विभागात पदनियुक्तीसाठी 'रेटकार्ड' ठरल्याची चर्चा वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी करीत आहे.आरोग्य परिमंडळाच्या 'उपसंचालक' पदासाठी ५० ते ६० लाख रुपये, जिल्हा आरोग्य अधिकारी पदासाठी २५ ते ३० लाख रुपये आणि महापालिकेच्या आरोग्य प्रमुखासाठी एक ते दीड कोटींपेक्षा जास्त पैसे द्यावे लागत आहे. तर आरोग्य संचालक पदासाठी किती रुपये द्यावे लागत असतील? अशी चर्चा खुद्द आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे.वय वाढविले पण पदोन्नती नाही

मागील बऱ्याच वर्षापासून वर्ग १ व वर्ग २ च्या पदोन्नती रखडलेल्या आहेत. जलद गतीने पदोन्नती करण्याबाबत ९ मार्च २०२२ रोजी परिपत्रक काढण्यात आले. सविस्तर असलेल्या कृती कार्यक्रम परिपत्रकाला आरोग्य विभागाने हरताळ फासला. अत्यावश्यक सेवा व रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित करीत निवृत्तीचे वय नियतवयोमानानुसार ५८ नंतर ६० वर्षे वाढविले. मग कोरोनाचे संकट पुढे करुन ६२ वर्षे पर्यंत वाढविले. ३१ मे २०२३ पर्यंत मुदतवाढ कोर्टाने अंतिम केली.

टॅग्स :Healthआरोग्यAmravatiअमरावती