शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मला तुमचे पाच दिवस द्या, मी सतत पाच वर्षे सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 11:14 IST

रवी राणा यांचे मतदारांना भावनिक आवाहन; मुख्य प्रचार कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : मत विभाजन करून फक्त पाडण्यासाठी उभे असणारे लोक ओळखा. जनतेने लोकसभेत खासदार गमावला. जिल्हा १५ वर्षे मागे गेला. पण ही चूक पुन्हा करू नका. मला तुमचे पाच दिवस द्या, मी सतत पाच वर्ष सेवेत राहणार, असे भावनिक आवाहन बडनेरा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवी राणा यांनी सोमवारी येथे केले.

भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं आठवले, पिरिपा कवाडे, लहूजी शक्ती सेना, शेतकरी संघटना महायुतीचे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी समर्थवाडीचे सोपान महाराज फिरके यांच्या हस्ते पार पडले. बडनेरा मतदारसंघातील मध्यवर्ती गोपालनगर येथे मुख्य प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी हजारो मातृ-पितृ, युवा वर्ग रवी राणा यांना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या उत्साहात उपस्थित होते. कार्यक्रमात रवी राणा यांनी सर्व उपस्थित हजारो वयोवृद्ध नागरिकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करत त्यांचा आशीर्वाद घेतला. 

या दिमाखदार सोहळ्यात महायुतीचे उमेदवार रवी राणा यांनी माझ्यासाठी फक्त पाच दिवस द्या, मी आपल्यासाठी संपूर्ण पाच वर्ष देईल, असे अभिवचन दिले. काही लोक फक्त माझा पराभव करण्यासाठी मैदानात आहे. मत विभाजनामुळे लोकसभा निवडणुकीत काय झाले? हे मी काही सांगण्याची गरज नाही. नवनीत राणा खासदार असताना यांनी लोकसभेत अमरावती जिल्ह्याचा सन्मान वाढवला. त्यांच्या पुढाकाराने प्रथमतः संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाढवून देण्यात आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बडनेरा विधानसभा मतदारसंघात १,६०० कोटींच्या निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारले जात आहे. यात भाजपचे नेते किरण पातुरकर यांचादेखील मोठा वाटा असल्याची कबुली आमदार रवी राणा यांनी दिली. 

या सोहळ्याला समर्थवाडीचे महाराज सोपान भाऊसाहेब फिरके, आत्माराम पटेल, माजी आमदार डॉ. श्रीकांत देशपांडे, किरण पातुरकर, किरण महल्ले, सुनील काळे, रवींद्र खांडेकर, नीळकंठ कात्रे, जयंतराव वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, गणेश खारकर, अॅड. नंदेश अंबाडकर, चरणदास इंगोले, डॉ. श्रीराम कोल्हे, श्रीराम माहोरे, चंद्रकांत गुल्हाने, पुरुषोत्तम बनसोड, सुधाकर शेंदोरकर, सोपान महाराज फिरके, निळकंठ सतीश गावंडे, सुमती ढोके, नंदू हरणे, गणेशदास गायकवाड, किरण अंबाडकर, रवी हिवरकर, सुरेश यावले, ओमप्रकाश अंबाडकर, मुकेश उसरे, शिवदास घुले, राजू कुरील, सुखदेव तरडेजा, चंदा लांडे, संजय तिरथकर, विनय घिमे, जाधव घटाले, संध्या टिकले, डॉ. रूपेश खडसे, पंकज जाधव, विनोद कलंत्री, अतकरे साहेब, तालन ताई, विजया घोडेस्वार, संजय माहुलकर, संजय हिंगासपुरे, आदी अतिथी म्हणून उपस्थित होते. 

राणा किराणा-साड्या वाटते, तुमच्या पोटात का दुखतेनवनीत राणा आमचे विरोधक नेहमी आरडाओरड करतात, रवी राणा किराणा वाटते. साड्या वाटते. मग तुम्ही का बरं हे धाडस करत नाही? अरे माझे तुम्हाला चॅलेज आहे किमान दोन किलो साखर तरी घरोघरी वाढून दाखवा. साड्या नाही तर किमान एक ब्लाऊज पिस तर वितरित करण्यासाठी पुढाकार घेऊन दाखवा, असा टोला विरोधकांना माजी खासदार नवनीत राणा लगावला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४navneet kaur ranaनवनीत कौर राणाBadneraबडनेरा