लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म डी.) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रावर ‘डॉक्टर’ लिहिलेली पदवी प्रदान करावी, या मागणीसाठी डॉक्टर ऑफ फार्मसी असोशिएशनने संत गाडगेबाबा विद्यापीठावर सोमवारी धडक दिली. गत सहा वर्षांपासूनच्या या मागणीची दखल विद्यापीठाने घेतली नाही, असा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला. मात्र, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने ‘डॉक्टर’ यासंदर्भात सुस्पष्ट गाईडलाईन दिलेली नाही, अशी माहिती प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी विद्यार्थ्यांना दिली.यावेळी कुलसचिव तुषार देशमुख, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख, सिनेट सदस्य मनीष गवई, सुरक्षा विभागाचे रवींद्र सयाम यांनी विद्यार्थ्यांची मागणी समजून घेतली. फार्म डी अभ्यासक्रमाच्या सहा वर्षीय पदवीवर ‘डॉक्टर’ लिहिलेली पदवी का आवश्यक आहे, ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिली. यावेळी विनायक घायाळ, शुभम मिसळ, सागर मोरे, मनोज पिसुरे,अक्षय शेळके, प्रितम पाटील, ऋषिकेश बोरवार, महेश कछवे, प्राजक्ता निधानकर, अंकिता मनिकंदन आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.विद्या परिषदेने ‘डॉक्टर’ पदवी नाकारलीफार्म डी हा सहा वर्षांचा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रावर ‘डॉक्टर’ लिहिता येणार नाही, याबाबत विद्या परिषदेत निर्णय घेण्यात आला. ‘लोकमत’मध्ये ४ फेब्रुवारी रोजी ‘फार्मसी पदवीवर डॉक्टर नाहीच’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारी फार्म डी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला, हे विशेष.
डॉक्टर लिहिलेली पदवी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST
डॉक्टर ऑफ फार्मसी असोशिएशनने संत गाडगेबाबा विद्यापीठावर सोमवारी धडक दिली. गत सहा वर्षांपासूनच्या या मागणीची दखल विद्यापीठाने घेतली नाही, असा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला. मात्र, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने ‘डॉक्टर’ यासंदर्भात सुस्पष्ट गाईडलाईन दिलेली नाही, अशी माहिती प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी विद्यार्थ्यांना दिली.
डॉक्टर लिहिलेली पदवी द्या
ठळक मुद्देविद्यापीठात फार्म डी विद्यार्थ्यांची धडक : प्र-कुलगुरू, कुलसचिवांना निवेदन