अमरावती : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळातील चालक-वाहक अन्य कर्मचाऱ्यांना कोरोनापासून संरक्षणाकरिता कोविड लस देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
जिल्ह्यासह सर्वत्र कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता शासनाने या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य, महसूल, पोलीस अन्य कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील गंभीर व्याधीग्रस्त नागरिकांना कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, सतत प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या एसटी महामंडळाच्या चालक, वाहन व अन्य अधिकाऱ्यांना कोरोना लसीकरणासाठी सुविधा उपलब्ध केलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाच्या चालक,वाहन आणि अन्य कर्मचाऱ्यांना कोविड १९ च्या लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी एस.टी. कर्मचारी काँग्रसेच विभागीय अध्यक्ष प्रवीण चरपे, कार्याध्यक्ष चंद्रकांत देशमुख, विभागीय सचिव जयंत मुळे, उपाध्यक्ष अमिती पांडे, सदस्य डिप्टे, संदीप मुळे, विजय अग्रवाल, स्वर्गे, उमप आदींनी पालकमंत्री ठाकूर यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.