शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आशीर्वाद द्या, अन्यथा तुमच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 11:03 IST

रवी राणा यांचे धक्कादायक विधान : प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : आमच सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपयांचे ३ हजार करू. तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा. ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, मी तुमचा भाऊ ते १५०० रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असे धक्कादायक विधान आमदार रवी राणा यांनी केले. तर ज्याचे खाल्ले त्याला जागले पाहिजे तर सरकार देत राहते; पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असे ते म्हणाले.

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सोमवारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. आमदार रवी राणा यांनी उपस्थित महिलांना संबोधित करताना सरकारला आशीर्वाद द्या. मी तुमचा भाऊ आहे. अगोदर सरकार देत आहे. त्याचे ऋण जाणले पाहिजे. आशीर्वाद दिला नाही तर १५०० रुपये परत घेणार, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले. निवडणुकीत समोर कोण ऐरा-गैरा आहे, त्याचा विचार न करता मी तुमचा भाऊ बहिणीसोबत आहे, हाच विचार करा अन् मला आशीर्वाद द्या, असे विधानसुद्धा आमदार राणा यांनी काढले. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना दिलेला पराभवाचा आशीर्वाद नको तर तो विजयाचा आशीर्वाद पाहिजे, असे ते म्हणाले.

सरकारी पैसा हा रवी राणा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा नाही. राज्यातील भगिनींचा अपमान करणारी सत्ताधाऱ्यांची भाषा ही रवी राणा करीत आहे. सरकारने बहिणींची माफी मागावी. आमदार रवी राणा जे बोलले ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मनातलं बोलले. लाडकी बहीण ही निवडणुकीपुरती योजना असल्याचे आता स्पष्ट होत आहे.-विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, काँग्रेस

मते दिली नाही तर लाडक्या बहीण योजनेचे १५०० रुपये देणार नाही, योजनेचे पैसे हे रवी राणाच्या घरचे पैसे नसून हे शासनाचे पैसे आहे. राणा यांचा खरा चेहरा हा लोकांसमोर आलेला आहे. बडनेरा मतदारसंघातील लाडक्या बहिणी राखी पौर्णिमेला बांगड्या पाठवतील.-पराग गुडघे, महानगरप्रमुख, उद्धवसेना

बहीण-भावाचं नातं हे गमतीचं, आपुलकीचं, प्रेमाचं असले पाहिजे आणि त्या नात्यांबाबत मी बोललो. मात्र, विरोधक त्याचा बाऊ करत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. येणाऱ्या काळामध्ये सरकार आल्यावर १५०० रुपयांवरून तो तीन हजार रुपये महिना करण्याची मागणीसुद्धा मी करणार आहे. यात कुणीही कुणीही रा राजकारण करण्याची गरज नाही.-रवी राणा, आमदार

रवी राणा यांनी महिलांना धमकी दिली व अपमान केला. अंगणवाडी सेविकांना मेळाव्याला आल्या नाही तर लाभ मिळणार नाही म्हणून धमकी दिली. तर ही धमकी याच भगिनी रवी राणा यांची उतरल्याशिवाय राहणार नाही. १५०० रुपये त्यांच्या घरचे नाही. रवी राणांनी समस्त महिलांची माफी मागावी.-तुषार भारतीय, भाजप नेते

 

टॅग्स :Amravatiअमरावती