शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात घुंगरू बाजाराची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

दीपावलीनंतर येणारा जो आठवडा असतो, तो थाट्या व आदिवासी बांधवांकरिता घुंगरू बाजार म्हणून प्रसिद्ध असतो. मेळघाटातील आदिवासी बांधवांची संस्कृती, परंपरा विविधरंगी असल्या तरी प्रत्यक्ष मनोरंजनाच्या साधनांचा त्यांच्याकडे अभाव आहे. त्यामुळे कलागुणाच्या आधारावर ही मंडळी आपले मनोरंजन करून घेतात. चुरणी बाजारामध्ये लगतच्या ४५ आदिवासी गावांतील नागरिक सहभागी होत असतात.

ठळक मुद्देचुरणीत मोठी गर्दी, आदिवासींनी विचारली ख्यालीखुशाली, फगवाही

 मारोती पाटणकर    लोकमत न्यूज नेटवर्कचुरणी : गावातील आठवडी बाजारात आदिवासी व थाट्यांची लगबग चांगलीच रंगतदार ठरली आहे. बुधवारी सर्वात मोठा आठवडी बाजार अर्थात चुरणीत भरला. दिवाळी होताच मेळघाटातील आदीवासी बांधवांना वेध लागतात ते घुंगरू बाजाराचे. दिवाळीनंतर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत भरणार्‍या आठवडी बाजाराला घुंगरू बाजार म्हटले जाते. दीपावलीनंतर येणारा जो आठवडा असतो, तो थाट्या व आदिवासी बांधवांकरिता घुंगरू बाजार म्हणून प्रसिद्ध असतो. मेळघाटातील आदिवासी बांधवांची संस्कृती, परंपरा विविधरंगी असल्या तरी प्रत्यक्ष मनोरंजनाच्या साधनांचा त्यांच्याकडे अभाव आहे. त्यामुळे कलागुणाच्या आधारावर ही मंडळी आपले मनोरंजन करून घेतात. चुरणी बाजारामध्ये लगतच्या ४५ आदिवासी गावांतील नागरिक सहभागी होत असतात. यानिमित्त आदिवासी बांधव व थाट्या यांनी ढोलकीच्या तालावर मनसोक्त नाचून फगवा वसूल केला, फगव्याचा स्वरुपात मिळालेल्या पैशांचा उपयोग सामूहिक भोजन व  धार्मिक कार्याकरिता करण्याचे नियोजन होत आहे. वर्षानुवर्षे थाट्या व आदिवासी बाधवांनी ही परंपरा जोपासली आहे. चुरणी आठवडी बाजारात दूरदुरून आदिवासी बांधवांचे जत्थे उतरले होते. या बाजारामध्ये परिसरातील पाड्यांतील आदिवासी बांधव एकत्र आले. ख्यालीखुशाली विचारत त्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या. बाजारातील थाट्या व आदिवासी बांधवांच्या नृत्य व गायनाने संपूर्ण बाजारातील जनतेचे लक्ष वेधून घेतले होते. थाट्या व आदिवासी बांधवांच्या घुंगरू बाजाराची चर्चा नागरिकांच्या कानावर असल्यामुळे चुरणी आठवडी बाजारात गर्दी दिसून आली.

 

टॅग्स :MelghatमेळघाटBaazaarबाजार