कोरोना नावाचे भूत आमच्या मानगुटीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 05:00 AM2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:00:06+5:30

बाधितांना अमरावती येथे कोविड रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र त्यातील काही व्यक्तींनी ‘गाव चालू करा, आमच्या तब्येतीला काहीही झाले नाही. कोरोना नावाचे भूत प्रशासनाने आमच्या मानगुटीवर बसविले आहे’ असे विधान केले. तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला. परिणामी २१ ऑगस्ट रोजी आयोजित तपासणी शिबिरामध्ये केवळ २८ लोकांनी तपासणी केली. मात्र प्रशासनाविरोधात वातावरण निर्माण झाले.

A ghost named Corona is on our wrists! | कोरोना नावाचे भूत आमच्या मानगुटीवर!

कोरोना नावाचे भूत आमच्या मानगुटीवर!

Next
ठळक मुद्देप्रशासनावर आरोप : व्हिडिओ व्हायरल, मंत्र्यांकडून कारवाईचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदुर बाजार : ‘कोरोना नावाचे भूत प्रशासनाने आमच्या मानगुटीवर बसविले’ असा आरोप करणारा व्हिडिओ बनविणाऱ्यांसह तो व्हायरल करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत.
संपूर्ण जग कोरोना संक्रमणाच्या विळख्यात असताना अमरावती येथे उपचार घेत असणाऱ्या शिरजगाव कसबा येथील काही जणांनी कोरोना विषाणू संदर्भत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्याअनुषंगाने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिरजगाव कसबा येथे बुधवारी तातडीने बैठक घेतली. १८ ऑगस्ट रोजी शिरजगांव कसबा प्राथमिक आरोग्य केंद्रात येथे १०४ लोकांची तपासणी करण्यात आली. त्यात १९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. त्या बाधितांना अमरावती येथे कोविड रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र त्यातील काही व्यक्तींनी ‘गाव चालू करा, आमच्या तब्येतीला काहीही झाले नाही. कोरोना नावाचे भूत प्रशासनाने आमच्या मानगुटीवर बसविले आहे’ असे विधान केले. तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला. परिणामी २१ ऑगस्ट रोजी आयोजित तपासणी शिबिरामध्ये केवळ २८ लोकांनी तपासणी केली. मात्र प्रशासनाविरोधात वातावरण निर्माण झाले.

तर कोरोना वॉरियर्स गळून पडतील
आरोग्य, महसूल, पोलीस, पालिका प्रशासनासह सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचारी कोरोना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, काही व्यक्ती चुकीचे व्हिडियो व्हायरल करीत असल्याने कोरोना योध्यांचे मनोबल कमी होते. असा अपप्रचार करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महसूल प्रशासनाला दिले. या बैठकीत शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाश दीक्षित, तालुका अध्यक्ष आशीष वाटाणे, तहसिलदार अभिजित जगताप, गट विकास अधिकारी प्रफुल बोरखडे, थानेदार गोपाल उपाध्यायसह महसूल व आरोग्य विभगचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: A ghost named Corona is on our wrists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.