शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त मिळतंय? सावध व्हा, दिवाळे निघणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST

कोरोनामुळे मार्केटमध्ये शांतता होती. मात्र, यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदीला उधाण आले आहे. गिफ्ट व्हाउचरचे आमिष दाखवून गरजेपेक्षा अधिक खरेदी करण्यासदेखील बाध्य केले जात असल्याचे वास्तव आहे. व्हाउचर स्क्रॅच करण्यासाठी लिंक दिली जात आहे. त्यामुळे सेल, गिफ्टमध्ये वाहवत न जाता सजगपणे व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक ई-कॉमर्स वेबसाइटस्नी बंपर सेल घोषित करण्यात आलेले आहेत. बाजारभावापेक्षा कमी किमतीत मिळत असल्याचे पाहून अशा वेबसाइटस्वरील उत्पादनांवर उड्यादेखील पडत आहेत. मात्र, यातून फसवणुकीचे प्रमाणदेखील तेवढेच वाढल्याचे पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे स्वस्त किंवा सवलतीत मिळतेय म्हणून कुठल्याही लिंकवर क्लिक करण्याचा मोह टाळायला हवा. दिवाळीच्या दिवसात मोठी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे डोळसपणे आर्थिक व्यवहार करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे मार्केटमध्ये शांतता होती. मात्र, यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइनखरेदीला उधाण आले आहे. गिफ्ट व्हाउचरचे आमिष दाखवून गरजेपेक्षा अधिक खरेदी करण्यासदेखील बाध्य केले जात असल्याचे वास्तव आहे. व्हाउचर स्क्रॅच करण्यासाठी लिंक दिली जात आहे. त्यामुळे सेल, गिफ्टमध्ये वाहवत न जाता सजगपणे व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेवटच्या काही तासांची ऑफर

- शेवटच्या काही तासांची ऑफर’ अशी टॅगलाइन वापरून फसवणूक होऊ शकते. अशा जाहिरातींमधील वस्तूंची, ब्रँडची खातरजमा करावी.- जी वस्तू बाजारपेठेत २ हजार रुपयांची आहे, ती आता ऑर्डर केल्यास ५०० रुपयांत मिळविण्याचे प्रलोभन दाखविले जाते. मात्र, ५०० रुपयांमध्ये मिळणारी ती वस्तू खरोखर टिकाऊ आहे की टाकाऊ, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

ऑनलाइन खरेदीपूर्वी ही घ्या काळजी बनावट वेबसाइटपासून सावध राहा, अधिकृत वेबसाइटला प्राधान्य द्या. शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन निवडा. उत्पादन खरेदी करण्यापूर्वी इतर ग्राहकांनी दिलेले रिव्ह्यू नक्की वाचा. ऑनलाइन पेमेंट करताना क्रेडिट कार्डवरून ईएमआय करीत असाल तर, त्याचे हप्ते व कालावधी लक्षात घ्या. शक्यतो डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीसमोर पार्सल उघडा. 

ओळखीच्या दुकानातच खरेदी केलेली बरी‘आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतिष्ठान चालवीत आहोत. ब्रँड उत्पादनाची विक्री करतो. प्रतिष्ठान स्थायी स्वरूपाचे आहे. त्यामुळे ग्राहकांनी स्थानिकांच्या दुकानांना वाव द्यावा.एक व्यावसायिक

स्वस्त मिळतंय म्हणून हरखून जाऊ नका. जी वस्तू सवलतीत मागविली, त्या वस्तूंचा दर्जा अवश्य बघावा, अनोळखी लिंकवर जाऊ नका. क्युआर कोड स्कॅन करू नका. कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा.- रवींद्र सहारे, एपीआय सायबर ठाणे

 

टॅग्स :onlineऑनलाइनShoppingखरेदी