शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मनातील भीती काढा, आनंदासाठी काम करा- नंदकुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 17:57 IST

अमरावती : एवढ्या सभा, कार्यशाळा झाल्यात; पण आज कुठून सुरुवात करायची, कळत नाही. तुमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थितीमागील दुहेरी उद्देश मला माहीत आहे.

अमरावती : एवढ्या सभा, कार्यशाळा झाल्यात; पण आज कुठून सुरुवात करायची, कळत नाही. तुमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थितीमागील दुहेरी उद्देश मला माहीत आहे. तेव्हा मनातील भीती काढा व आनंदासाठी काम करा, असा संदेश शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी विषय साधन व्यक्तींच्या राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळेत दिला.विषय साधन व्यक्ती प्रदेश महासंघातर्फे विषयसाधन व्यक्ती यांच्यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन शासकीय विदर्भ महाविद्यालयातील संगीतसूर्य केशव भोसले सभागृहात करण्यात आले होते. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत गेल्या १० वर्षांपासून शिक्षणक्षेत्रात करार पद्धतीने काम करणा-या विषयसाधन व्यक्तींना शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे, हा आयोजनामागील उद्देश होता. नंदकुमार पुढे म्हणाले की, आज न उद्या नोकरीचा प्रश्न मार्गी निघेलच; पण आज ज्या चिमुकल्यांच्या भविष्यासाठी आपण काम करीत आहोत, त्यांचे भविष्य खराब होऊ नये, याची जबाबदारी आपण घेऊ या. शिक्षण क्षेत्रातील सर्वात तरुण वयोगट म्हणून मी तुमच्याकडे पाहत आहे. सर्व मरगळ झटकून कामाला लागा. मूल का शिकत नाही, याचा शोध घ्या. स्वत:चे अस्तित्व निर्माण करा, असा सल्ला नंदकुमार यांनी दिला.विचारमंचावर विद्या प्राधिकरणचे संचालक सुनील मगर, उपसंचालक सी.आर. राठोड, जिल्हा परिषदेचे सीईओ किरण कुलकर्णी, शिक्षण सल्लागार सिद्धेश वाडकर, डीआयसीपीडी अमरावतीचे प्राचार्य रवींद्र आंबेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.बी. तुरणकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके, श्याम मक्रमपुरे, जितेंद्र राठी, रत्नमाला खडके उपस्थित होते. कार्यक्रमाला राज्यभरातील दोन हजारांवर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश आंबेकर, संचालन विषयसाधन व्यक्ती राजेश नाईक व गायकवाड, तर आभार प्रदर्शन विवेक राऊत व संघटनेचे राज्यध्यक्ष परमेश्वर काकडे यांनी केले.

टॅग्स :Amravatiअमरावती