(फोटो)
अमरावती : सांस्कृतिक भवनाजवळील महापालिकेच्या संत गाडगेबाबा व्यापारी संकुलात स्वच्छता कंत्राटदारामार्फत सफाई केली जात नाही व कचरा जमा केला जात नसल्याने कचऱ्याचे ढिगारे लागले आहे. स्वच्छता कंत्राटदारांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने संकुलातील दुकानदारांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
स्वच्छतेचे महान पुजारी असलेल्या संत गाडगे महाराजांच्या नावाने असणाऱ्या व्यापारी संकुलातील अस्वच्छता व ठिकठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिसत नाही काय? झोन कार्यालय काय? करते. या ठिकाणी जर रोज कचरा संकलन होत नसेल तर दैनंदिन स्वच्छता कंत्राट काय? कामाचा व या कंत्राटदाराला बिल कशाचे देता, असा नागरिकांचा सवाल आहे. सार्वजनिक ठिकाणी नियमित स्वच्छतेची मुख्य अट या कंत्राटदाराच्या करारनाम्यात घातलेली असताना त्याची अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित विभागाची असताना दुर्लक्षामुळे या भागात सर्वत्र अस्चच्छता आहे. प्रभागातही रोज कचऱा संकलन केले जात नाही, सोबतच धुवारणी व फवारणी केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.