शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार, मामेभावासह एकाचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 17:54 IST

सात वर्षीय मामेबहिणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघडकीस आला

अमरावती :  सात वर्षीय मामेबहिणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री अमरावतीत उघडकीस आला. या घटनेतील दोन्ही नराधमांना नागरिकांनी चोप दिल्यामुळे भीमनगर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. गाडगेनगर पोलिसांनी तत्काळ दखल घेत संदीप गंगाराम वानखडे (रा. भीमनगर) याला अटक केली. नागरिकांच्या मारहाणीतून वाचत आरोपी अजय संजय भटकर हा पसार झाला आहे. 

भीमनगरातील झोपडपट्टीत राहणारा संदीप वानखडे हा पीडित मुलीचा मामेभाऊ आहे. पीडिताची आई मनोरुग्ण असून, तिचा विवाह उत्तर प्रदेशातील एका तरुणाशी लावण्यात आला. दोन मुले व एक मुलगी झाल्यानंतर ती अमरावतीत परतली. ती मनोरुग्ण अवस्थेत शहरात फिरते, तर मुलांचे संगोपन मामा करते. पीडिताचा मामा कटला चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, तर त्याचा मुलगा संजय हा पन्नी वेचण्याचे काम करते.

शनिवारी सात वर्षीय पीडित मुलगी रडत असल्याचे परिसरातील एका महिलेच्या निदर्शनास आले. तिने पीडिताला प्रेमाने जवळ घेऊन विचारपूस केली असता तिने पोटात दुखत असल्याचे सांगितले. संजयसह अन्य एकाने उचलून झोपडी नेले व तेथे आळीपाळीने रात्रभर लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक कथन पीडिताने केले. त्यांनी या चिमुकलीला जिवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले होते. सदर महिलेने पीडित मुलीला घेऊन गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (ड), ३७६ (एफ), ३७६ (२) (आय), ३७६ (२) (जे), ३७६ (२) (के), ३७६ (२) (एन) सह कलम ४, ६, १० पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. 

दोन्ही नराधमांना नागरिकांचा चोपसात वर्षीय बालिकेच्या लैंगिक शोषणाची वार्ता पसरताच नागरिकांनी दोन्ही आरोपींना पकडून चोप देण्यास सुरुवात केली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक मनीष ठाकरेंसह पोलिसांचा ताफा पोहोचला. पोलिसांनी संदीप वानखडेला अटक केली. पसार अजय भटकरच्या शोधात गाडगेनगर ठाण्याचे पथक रवाना झाले आहे.

अनेकदा लैंगिक अत्याचार पीडित मुलगी ही नातलग असल्यामुळे आरोपीच्या घरात तिची ये-जा असायची. घरी कोणी नसले की, आरोपी बालिकेवर लैंगिक अत्याचार करायचे. आरोपींनी बरेचदा पीडिताचे लैंगिक शोषण केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. 

पीडित बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळताच तत्काळ दखल घेत घटनास्थळ गाठले. घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. एका आरोपीला अटक करण्यात आली असून, एकाचा शोध सुरू आहे. मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.