शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महिला चोरांची टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:57 IST

आॅटो, बसप्रवासादरम्यान महिलांजवळील रोख वा दागिने लंपास करणारी महिलांची टोळी शहरात सक्रीय झाली आहे. मंगळवारी फे्रजरपुरा हद्दीत आॅटो प्रवासी महिलेच्या पर्समधून ५६ हजार ४०० रुपयांची रोख लंपास झाली, तसेच राजापेठ हद्दीत बसप्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोख असा एकूण ९१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

ठळक मुद्देएकाच दिवशी दोन घटना : दोन महिलांकडील रोख, दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आॅटो, बसप्रवासादरम्यान महिलांजवळील रोख वा दागिने लंपास करणारी महिलांची टोळी शहरात सक्रीय झाली आहे. मंगळवारी फे्रजरपुरा हद्दीत आॅटो प्रवासी महिलेच्या पर्समधून ५६ हजार ४०० रुपयांची रोख लंपास झाली, तसेच राजापेठ हद्दीत बसप्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोख असा एकूण ९१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यामुळे आॅटो व बसचा प्रवास करताना महिलांनी सावधगिरी बाळगणे अनिवार्य झाले आहे.शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वर्षभरात २० ते २५ गुन्ह्यांत महिलाचोरांचा सहभाग वाढल्याचे आढळून आले आहे. अमरावती शहरातील सर्वसाधारण व मध्यवर्गीय अनेक महिला आॅटो व बसने प्रवास करीत आपआपल्या कामात मग्न असतात. बेसावधपणे प्रवास करणाऱ्या या महिलांजवळील रोख व दागिन्यावर महिलाचोरांनी आता लक्ष वेधले आहे. आॅटो किंवा बसमध्ये महिला चोर महिला प्रवाशाजवळ बसून प्रवासी असल्याचे दाखवितात.दरम्यान दुसरीकडे आपले लक्ष वेधून बेसावध असताना हातसफाई करून पर्समधील रोख व दागिने चोरतात. प्रवासी आॅटोतून खाली उतरल्यानंतर त्यांना रोख व दागिने लंपास झाल्याचे माहिती पडत आहे. अशाप्रकारच्या अनेक घटना शहरात घडल्या असून, या घटनांवरून शहरात महिला चोर सक्रिय झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या महिला चोरांना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.पर्समधून चोरून नेली छोटी पर्सआपल्या पतीसोबत अकोल्यावरून अमरावतीत आलेली महिला नवाथेनगर चौकात मंगळवारी दुपारी बसमधून उतरली. तेथून ते दाम्पत्य नातेवाईकांच्या घरी गेले. त्यावेळी खांद्यावरील पर्समधील छोटी पर्स चोरी गेल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने व १० हजारांची रोख असा ९१ हजारांचा मुद्देमाल महिला चोरांनी चोरून नेला आहे. या घटनेची तक्रार राजापेठ पोलिसांत नोंदविण्यात आली असून, पोलिसांनी दोन अज्ञात महिलांविरुद्ध भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.आॅटो प्रवासी महिलेचे ३३ हजार ५०० रुपये लंपासफे्रजरपुरा हद्दीतील एका महिलेने भारतीय स्टेट बँकेतून ९० हजारांची रोख काढली. त्यानंतर ती महिला राजेंद्र कॉलनीतील बहुउद्देशीय नागरिक सहकारी पतसंस्था येथे कर्जाची रक्कम ५६ हजार ४०० रुपये भरण्यासाठी गेली. त्यानंतर उर्वरित रक्कम ३३ हजार ५०० रुपये महिलेने जवळील पर्समध्ये ठेवले. तेथून ती महिला राजेंद्र कॉलनीतून मैत्रिणीसोबत आॅटोने मोतीनगरपर्यंत आली. दरम्यान, आॅटोमधील अज्ञात महिला प्रवाशाने पर्समधून ३३ हजार ५०० रुपयांची रोख उडविली. या घटनेची तक्रार महिलेने फ्रेजरपुरा पोलिसात केली आहे.नागरिकांनी स्वत:च घ्यावी काळजी, पोलिसांचे आवाहननवीन ठिकाणी प्रवास करताना नागरिकांनी प्रवासात आपली पर्स व बॅग सांभाळून ठेवावी, पैशांसह दागिन्याची स्वत:च काळजी घ्यावी, तेव्हाच अशा घटनांना आळा बसेल, असे आवाहन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी केले. पोलीस आपल्या परीने तपास करून आरोपीचा निश्चितच शोध घेईल, असेही सातव म्हणाले.

टॅग्स :Thiefचोर