लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शहरातील गांधी मार्केटमधील अतिक्रमण हटविण्याची कारवाई मुख्याधिकारी प्रमोद वानखडे यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली आहे. आठ दिवस ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे.गांधी मार्केटमध्ये रस्त्याच्या बाजूला भाजीपाल्याची दुकाने पुष्कळ वर्षांपासून थाटलेली होती. त्यामुळे या मार्गाने दुचाकी चालविणेदेखील शक्य होत नव्हते. त्यातच ग्राहक स्वत:ची दुचाकीसुद्धा रस्त्यात उभी करीत होते. या सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना तीन नोटीस व मुनादी देण्यात आल्यानंतरही अतिक्रमण आवरते घेतले नव्हते. त्यामुळे नगर परिषदेने अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. यामध्ये अतिक्रमिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.वसंत मेडिकलसमोरील मंत्री मार्केट रस्त्यावरसुद्धा फळविक्रेत्यांनी पुष्कळ दिवसांपासून दुकाने थाटलेली आहेत. त्यांच्यातील अंतर्गत वादात काही दिवसांपूर्वी दुकान जाळण्यात आले होते. तथापि, पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमिकांनी ताबा घेतला होता. या सर्व जागा जेसीबीच्या साहाय्याने नगर परिषदेने मोकळ्या केल्या. एसटी डेपो परिसरात हेमंत लकडे यांच्या कॉम्प्लेक्ससमोर पुष्कळ दिवसांपासून अतिक्रमणचा वाद होता. तो पोलीस ठाण्यात गेला होता. ते अतिक्रमणदेखील हटविण्यात आल्यामुळे छत्रपती कॉम्प्लेसमधील दुकानांपुढील मार्ग मोकळा झाला. अतिक्रमण कायमस्वरूपी हटविण्यात यावे, अशी मोर्शीकर नागरिकांची मागणी आहे.पुनर्वसन कॉलनीतील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. ही मोहीम फक्त एक दिवसाची नसून, आठ दिवस राहणार आहे.- प्रमोद वानखडे, मुख्याधिकारी.
मोर्शी शहरातील गांधी मार्केट अतिक्रमणमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST
वसंत मेडिकलसमोरील मंत्री मार्केट रस्त्यावरसुद्धा फळविक्रेत्यांनी पुष्कळ दिवसांपासून दुकाने थाटलेली आहेत. त्यांच्यातील अंतर्गत वादात काही दिवसांपूर्वी दुकान जाळण्यात आले होते. तथापि, पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमिकांनी ताबा घेतला होता. या सर्व जागा जेसीबीच्या साहाय्याने नगर परिषदेने मोकळ्या केल्या. एसटी डेपो परिसरात हेमंत लकडे यांच्या कॉम्प्लेक्ससमोर पुष्कळ दिवसांपासून अतिक्रमणचा वाद होता. तो पोलीस ठाण्यात गेला होता.
मोर्शी शहरातील गांधी मार्केट अतिक्रमणमुक्त
ठळक मुद्देआठ दिवस सुरू राहणार कारवाई । जेसीबीच्या साहाय्याने रस्ते मोकळे