लोकमान्य चौकात जुगार पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:14 AM2021-04-02T04:14:23+5:302021-04-02T04:14:23+5:30

अमरावती: वलगाव पोलिसानी लोकमान्य चौक वलगाव येथे कारवाई जुगाराच्या साहित्यासह ३५० रूपयाचा जुगार पकडला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. ...

Gambling caught in Lokmanya Chowk | लोकमान्य चौकात जुगार पकडला

लोकमान्य चौकात जुगार पकडला

Next

अमरावती: वलगाव पोलिसानी लोकमान्य चौक वलगाव येथे कारवाई जुगाराच्या साहित्यासह ३५० रूपयाचा जुगार पकडला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. आरोपी बंडु नथ्युजी माने (५२, रा. शनिमंदीर वलगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

---------------------------------------------

गर्ल्स हायस्कुल चौकात दारु पकडली

अमरावती: गाडगेनगर पोलिसांनी येथील गर्ल्स हायस्कुल चौकात कारवाई करुन अवैधदारु व दुचाकी असा एकूण ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. या प्रकरणी आरोपी सतीश शिवनारायण जयस्वाल(४०, रा. रहाटगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-------------------------------------------

क्षुल्लक कारणावरून पाईपाने मारहाण

अमरावती: गैरकायद्याची मंडळी जमवून घरात वृद्धास व त्याच्या मुलास बाहेर आणून पाठीवर पायावर पाईपने मारहाण करून जखमी केल्याची घटना महाजनपुऱ्यात मंगळवारी घडली. या प्रकरणी बुधवारी गुन्हा नोंदविला.

चंदु पुंडलीक आठवले (३२, रा. महाजनपुरा) अधीक तीन आरोपीविरोधात पोलसांनी गुन्हा नोंदविला. रमे गवई (६८, रा. महाजनपुरा) यांनी खोलापुरीगेट ठाण्यात तक्रार नोंदविली.

Web Title: Gambling caught in Lokmanya Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.