शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

डीसीपीएसधारकांचे भवितव्य ‘एनपीएस’मध्ये वर्ग, शिक्षक वगळून जि.प. कर्मचा-यांसाठी निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 19:00 IST

अमरावती - परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन (डीसपीएस) योजनेंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाºयांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनत (एनपीएस) मध्ये वर्ग केली जाणार आहे. यातून शिक्षकांना वगळण्यात आले आहे. डीसीपीएसधारकांची जमा रक्कम एनपीएसमध्ये वर्ग करण्यात येत असल्याने आता तरी या संपूर्ण रकमेचे हिशेब कर्मचा-यांना मिळतील, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद कर्मचा-यांमध्ये उमटली आहे.नोव्हेंबर ...

अमरावती - परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन (डीसपीएस) योजनेंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाºयांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनत (एनपीएस) मध्ये वर्ग केली जाणार आहे. यातून शिक्षकांना वगळण्यात आले आहे. डीसीपीएसधारकांची जमा रक्कम एनपीएसमध्ये वर्ग करण्यात येत असल्याने आता तरी या संपूर्ण रकमेचे हिशेब कर्मचा-यांना मिळतील, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद कर्मचा-यांमध्ये उमटली आहे.नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत नियुक्त झालेल्या कर्मचा-यांसाठी पारंपारिक निवृत्तीवेतन योजनेऐवजी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली. त्यानुसार योजनेचे सदस्य असलेल्या शासकीय कर्मचा-यांच्या वेतनातून दरमहा १० टक्के रक्कम अंशदान म्हणून कपात करण्यात येत आहे. तेवढीच रक्कम अर्थात १० टक्के रक्कम शासनाच्या समतुल्य हिस्सा म्हणून एकूण २० टक्के रक्कम डीसीपीएसधारकांच्या खात्यात जमात होणे अनिवार्य आहे.कर्मचा-यांच्या वेतनातून कपात करण्यात केलेले अंशदान, त्यावरील व्याज, शासनाचा समतुल्य वाटा व त्यावरील व्याजाच्या जमा झालेल्या एकूण रकमेचा हिशेब कर्मचा-यांना देणेही बंधनकारक आहे. मात्र, अनेक वर्षांपासून वेतनातून नियमित कपात होत असली तरी आतापर्यंत किती रक्कम कपात झाली. शासनाच्या वाट्याची रक्कम किती व त्यावरील व्याजाबाबत हजारो डीसीपीएसधारक अनभिज्ञ आहेत. त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा रकमेचा कुठलाही हिशेब मिळालेला नाही. पावत्याही मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील हजारो डीसीपीएसधारक त्यांच्या भविष्याबाबत अनभिज्ञ आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कर्मचा-यांची (शिक्षक वगळून) डीसपीएस अंतर्गत जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत वर्ग करण्याच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. डीसीपीएस धारकांची जमा रक्कम एनपीएसमध्ये वर्ग करताना ही रक्कम विश्वस्त बँक म्हणून अ‍ॅक्सीस बँकेत जमा होणार आहे. निवृत्तीवेतन निधी विनिमायक व विकास प्राधीकरणाने अ‍ॅक्सिस बँकेची विश्वस्त बँक म्हणून निवड केली आहे. डीसीपीएसधारकांना त्यांच्या खात्यातून कपात केलेल्या रकमेस शासनाच्या समतुल्य वाट्याचा हिशेब हवा आहे. एनपीएसमध्ये रक्कम जमा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते, त्यावर निर्णयाचे भवितव्य अवलंबून आहे.-पंकज गुल्हाने, अध्यक्ष जि.प. युनियन, अमरावती