आठ दिवसांत ६१ कोरोना मृतदेहांवर अंंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:18 AM2021-02-26T04:18:46+5:302021-02-26T04:18:46+5:30

अमरावती : येथील हिंदू स्मशानभूमीच्या गॅस दाहिनीत १७ ते २४ फेब्रुवारी तब्बल ६१ कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अन्य ...

Funeral on 61 corona bodies in eight days | आठ दिवसांत ६१ कोरोना मृतदेहांवर अंंत्यसंस्कार

आठ दिवसांत ६१ कोरोना मृतदेहांवर अंंत्यसंस्कार

Next

अमरावती : येथील हिंदू स्मशानभूमीच्या गॅस दाहिनीत १७ ते २४ फेब्रुवारी तब्बल ६१ कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अन्य व्यक्तींच्याही मृत्यूसंख्येत वाढ झाल्याची माहिती स्मशानभूमीचे प्रबंधकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी गुरुवारी हिंदू स्मशानभूमीत भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला.

महापालिका क्षेत्रात कोरोना संक्रमित आणि मृत्यूसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे येथील हिंदू स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना प्रचंड ताण येत असल्याचे वास्तव आयुक्तांनी पाहणीअंती टिपले. तेव्हा हिंदू स्मशानभूमी संस्थेचे अध्यक्ष आर.बी. अटल यांना आयुक्त रोडेंनी अंत्यसंस्कारासाठी ओटे वाढविण्याचा सल्ला दिला. मात्र, अटल यांनी ओटे वाढविण्यापेक्षा गॅस दाहिनीचे नवे युनिट देण्याची मागणी केली. तेव्हा प्रस्ताव द्या, गॅस दाहिनी युनिटसाठी सहकार्य करू, असे आयुक्तांनी आश्वस्त केले.

----------------

गॅस दाहिनीत अंत्यसंस्कारसाठी दोन तास

गॅस दाहिनीत सकाळी ८ ते रात्री १० वाजतादरम्यान कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. गॅस दाहिनी निरंतरपणे सुरू राहत असल्याने या भागाचे तापमान प्रचंड वाढले आहे. मध्यंतरी १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान गॅस दाहिनीत तांत्रिक बिघाड आला होता. तेव्हा कोरोना मृतदेहांचे अंत्यसंस्कार सरणावर करण्यात आले. आता गॅस दाहिनी नियमित सुरू असून यात कोरोना मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहे.

-------------------

कोरोना मृतदेहासाठी एकच शववाहन

सुपर स्पेशालिटीत कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यास ते शव वाहून नेण्यासाठी एकच वाहन आहे. हिंदू स्मशानभूमीत कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतरच दुसरा मृतदेह नेला जाताे. तोपर्यंत नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागते.

-------------------

हिंदू स्मशानभूमीची गुरुवारी पाहणी केली. कोविड नॉन कोविड रुग्ण अंत्यविधीसाठीच्या सुविधा जाणून घेतल्या. संस्थेचे प्रश्न, समस्यावर चर्चा झाली. दरम्यान संस्थेला गॅस दाहिनीचा नवा प्रस्ताव देण्याचे सांगितले. याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ.

- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका

Web Title: Funeral on 61 corona bodies in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.