शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

निधीकपातीला धार्मिकतेचा मुलामा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:33 PM

आर्थिक दुर्बल घटक -मुस्लिम या शिर्षाअंतर्गत अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या अल्पतरतुदीवर आक्षेप घेत एमआयएमने सोमवारी सभागृहातच ठिय्या दिला. सभागृहातील मोकळ्या जागेत भाजप, एमआयएमसह काँग्रेसी नगरसेवक परस्परांसमोर उभे ठाकल्याने अनागोंदी निर्माण झाली व तासाभरातच आमसभा गुंडाळण्यात आली.

ठळक मुद्देभाजप- एमआयएम समोरासमोर : आमसभेत अभूतपूर्व गोंधळ, धार्मिक घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आर्थिक दुर्बल घटक -मुस्लिम या शिर्षाअंतर्गत अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या अल्पतरतुदीवर आक्षेप घेत एमआयएमने सोमवारी सभागृहातच ठिय्या दिला. सभागृहातील मोकळ्या जागेत भाजप, एमआयएमसह काँग्रेसी नगरसेवक परस्परांसमोर उभे ठाकल्याने अनागोंदी निर्माण झाली व तासाभरातच आमसभा गुंडाळण्यात आली.भाजपचे तुषार भारतिय यांनी प्रत्युत्तर देत धर्माच्या नावावर लेखाशिर्ष तरी कसा, असा सवाल उपस्थित केला. वाढीव तरतुदीला धार्मिकतेचा रंग चढल्याने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला. सोमवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या आमसभेला गोंधळातच सुरुवात झाली. नगरसेविका जयश्री कुºहेकर या अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांच्याबाबत वादळी चर्चा करत असतानाच आर्थिक दुर्बल घटक -मुस्लिम या शिर्षाअंतर्गत आधी तीन कोटींची तरतूद असताना ती एक कोटी रुपये का करण्यात आली, असा सवाल एमआयएमचे अ. नाजिम यांनी प्रशासनाला विचारला. ती तरतूद ३ कोटी रुपये ठेवावी, अशी सुचना आपण केली होती, ती सुचना अव्हेरत त्यात कपात करुन सभागृह मुस्लिम विकासाविरोधी असल्याची लोकभावना व्यक्त होत असल्याचे मत त्यांनी मांडले. आयुक्त व महापौर बोलण्यास तयार नसल्याने एमआयएमच्या सदस्यांनी सभागृहातील पहिल्या रांगेसमोर असलेल्या मोकळ्या जागेत ठिय्या दिला. स्विकृत सदस्य मिलिंद चिमोटे यांनी वाढीव तरतूद देऊन अर्थसंकल्प का फुगवायचा ? या हेतूने ती तरतूद कमी केल्याचे मत व्यक्त केले. मुस्लिमबहूल क्षेत्राशी संबंधित लेखाशिर्षातच कपात का , अन्य शिर्ष का वाढवलेत ,असा प्रश्न नाजिम यांनी चिमोंटेंना केला. त्यानंतरही चिमोटे यांनी खर्च वाचून दाखविला. मात्र मागील वर्षी खर्च झालाच नसल्याच मत प्रशांत डवरे व नीलिमा काळे यांनी मांडले. ही वादळी चर्चा सुरु असताना अनेक भाजपाई एकत्र आल्याने गदारोळ झाला. एकत्रित बसून निर्णय घेतला पाहिजे, असे विलास इंगोले म्हणाले. त्यानंतर मुळात हे लेखाशिर्षच चुकीचे आहे. कुठल्या महापालिकेत धर्माच्या नावावर तरतूद केली जाते, असा मुद्दा भारतिय यांनी मांडला. त्यांच्या या वक्तव्याचे भाजपसदस्यांनी बाके वाजवून समर्थन केले. ‘जयश्रीराम’चे नारे गुंजले, तर काँग्रेसकडून विकासाच्या मुद्याला भाजप वेगळा रंग देत असल्याचा प्रत्यारोप झाला. या गदारोळात महापौरांनी १० मिनिटांसाठी सभा स्थगित केली. सभा पुन्हा सुरु झाल्यावर चिमोटे यांनी दिलेली सुचना मंजूर करण्यात येत असल्याचा निर्णय सभापतींनी दिला. मात्र चिमोटे यांनी नेमकी काय सूचना केली ती सांगणे नरवणे यांनी टाळले. त्यामुळे नाजिम व एमआयएमचे अन्य सदस्य ठिय्या आंदोलनावर ठाम राहिले. या गोंधळातच सहायक आयुक्त राहूल ओगले यांच्या परतीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर सभा गुंडाळण्यात आली.कंत्राटी सदार म्हणतात... मी महापालिकेचा वाघ !नगरसेविकेचा हल्लाबोलअमरावती : नगरसेविकांच्या प्रश्नाची दखल घेतली जात नाही. एवढेच काय तर कंत्राटी अभियंता जीवन सदार आपण महापालिकेचे वाघ आहोत, तुम्ही चुकीच्या माणसांच्या मागे लागलात, अशी दर्पोक्ती करतात, आयुक्त साहेब, आता तुम्हीच उत्तर द्या, अशा शब्दात नगरसेविका जयश्री कुºहेकर यांनी सोमवारी मनपा सभागृह दणाणून सोडले.सदार स्वत:ला महापालिकेचा वाघ संबोधतात. वाघ तर जंगलात असतात, ही तर महापालिका आहे, अशी शब्दखेळी करत कुºहेकर यांनी त्यांच्या वागणुकीवर हल्लाबोल केला. कंत्राटदारांची ९० कोटी रुपये थकलीत, त्यातून प्रभाग क्र. ११ मध्ये कुठले काम झाले, असा कुऱ्हेकर यांचा प्रश्न होता. मात्र सदारांनी दोन आमसभा उलटूनही या प्रश्नाचे उत्तर न दिल्याने ते लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याचे त्यांनी बजावले. कुºहेकर यांचा सात्विक संताप पाहता आयुक्तांनी मध्यस्थी केली. माहिती विनाविलंब देऊ, असे सांगत सदारांना पाठीशी घातले. सुपर कमिश्नर म्हणून ओळखले जाणाऱ्या सदारांना पहिल्यांदाच एखादया नगरसेवकाने इतके फटकारले.सभागृहातही ‘जय श्रीराम’वाढीव निधीच्या मुद्यावरुन भाजप व एमआयएमचे सदस्य परस्परांसमोर उभे ठाकले असताना सभागृहात रणकंदन झाले.त्यावेळी सभागृहात हलकल्लोळ माजला. त्यातच शहर सुधारचे सभापती सचिन रासणे यांनी ‘जय श्रीराम’ची घोषणा दिली. सभागृहात पहिल्यांदाच धार्मिक घोषणाबाजी झाल्याने स्थिती पार नियंत्रणाबाहेर गेली.विकासाच्या विषय धर्मावर नेत असल्याचा आरोप कॉग्रेसचे प्रशांत डवरे व निलिमा काळे यांनी केला.मात्र सभागृहातील वातावरण नियंत्रणाबाहेर गेल्याने गोंधळ वाढतच गेला.रासणेंच्या घोषणाबाजीला भाजपने बळ दिले.पे अ‍ॅन्ड पार्कवरुन भाजपचा निषेध‘पे अ‍ॅन्ड पार्क’वर आमसभेत तोडगा काढू, असे आश्वासन मनसेला मिळाले होते. मात्र गदारोळात त्यावर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी सभागृहात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सभागृहाबाहेर रोखण्यात आल्याने त्यांची भाजप नगरसेवकांशी शाब्दिक चकमक झाली. काँग्रेस राकॉ व मनसे कार्यकर्त्यांनी भाजपविरुध्द जोरदार नारेबाजी केली.तेव्हा भाजपच्या राधा कुरिल यांनी ‘जय श्रीराम’ने त्यास प्रत्युत्तर दिले.