शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भातकुली, खोलापुरी गेट ठाण्याच्या इमारतींना निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 05:00 IST

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या व प्रत्यक्ष काम सुरू झालेल्या मेळघाट चिखलदरा येथील पर्यटकांचे आकर्षण स्थळ ठरणाऱ्या व स्थानिकांच्या रोजगार निर्मितीस पूरक ठरणाऱ्या आशिया खंडातील तिसऱ्या क्रमाकांचे स्कायवॉकचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून निधीअभावी २० टक्के काम रखडले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी  लक्ष घालून तत्काळ निधीची तरतूद करावी व या स्कायवॉकला “छत्रपती शिवाजी महाराज”यांचे नाव द्यावे, .....

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली व खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांच्या स्वतंत्र इमारत निर्मितीसाठी  निधी मिळावा, अंजनगाव बारी येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, अशी मागणी आमदार रवि राणा यांनी शनिवारी विधानसभेत केली. दरम्यान, पोलिसांच्या विविध समस्या, प्रश्नावरही त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. आमदार रवी राणा यांनी पुरवणी मागण्या चर्चेवेळी विधानसभेत मागणी करताना पोलीस बांधवांच्या व्यथा मांडल्यात. पोलीस दरदिवशी तणावपूर्ण स्थितीत अहोरात्र काम करतात. त्यांना कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावता यावे यासाठी वेतनात वाढ करावी, अशी मागणी आमदार राणा यांनी केली. अहोरात्र सामान्य नागरिकांचे रक्षण करणाऱ्या व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी झटणाऱ्या पोलीस बंधू-भगिनींना चांगल्या निवासी सुविधा द्या, अशी मागणीही आमदार रवि राणा यांनी केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या व प्रत्यक्ष काम सुरू झालेल्या मेळघाट चिखलदरा येथील पर्यटकांचे आकर्षण स्थळ ठरणाऱ्या व स्थानिकांच्या रोजगार निर्मितीस पूरक ठरणाऱ्या आशिया खंडातील तिसऱ्या क्रमाकांचे स्कायवॉकचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून निधीअभावी २० टक्के काम रखडले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी  लक्ष घालून तत्काळ निधीची तरतूद करावी व या स्कायवॉकला “छत्रपती शिवाजी महाराज”यांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार रवि राणा यांनी विधानसभेत केली.मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून विदर्भ विकासाला हातभार लावावा, असे आवाहनदेखील आमदार राणा यांनी केले. 

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाChikhaldaraचिखलदरा