शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष

By admin | Updated: April 11, 2015 00:10 IST

उन्हाळ्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता..

निर्देश : आरोग्य समितीच्या बैठकीत निर्णयअमरावती : उन्हाळ्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात या रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य समितीच्या सभेत जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती सतीश हाडोळे यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. वाढते तापमान व कडक उन्हामुळे उष्माघातासोबतच काही साथजन्य आजारसुद्धा फैलावण्याची शक्यता आहे. शहरी भागात रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळू शकते. मात्र ग्रामीण भागात तसे नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी आतापर्यंत विशेष सुविधा नव्हती. औषधींचा पुरवठा नियमित होत असला तरी विशेष व्यवस्थेअभावी अनेकदा रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात येते ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे. सामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होते. अशा वेळी गावातील लोक मिळेल तेथून पाणी पिण्यासाठी वापरतात. या दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना लेखी पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)पाणी स्रोत नियंत्रणासाठी खबरदारीच्या सूचनाग्रामीण भागात पिण्याचे पाण्याचे स्त्रोत, पाणी टंचाईमुळे काही ठिकाणी दूषित होतात. अशावेळी पर्याय म्हणून मिळेल तेथून पाणी आणून तहान भागविली जाते, हा प्रकार बहुधा मेळघाटात होतो. परंतु मेळघाटसह इतरही ग्रामपंचायतींना दूषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी आरोग्य सभापतींनी सर्व ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत.अशा आहेत सुविधा जिल्हा परिषदेच्या ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालय येथे असलेल्या रूग्णांच्या वॉर्डमध्ये उष्माघाताच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी या विशेष कक्षात रूग्णासाठी वाताणुकुलीत व्यवस्थेसाठी कुलर, पंखा या साधनाच्या माध्यमातून रूग्णांना थंड वातावरण मिळावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पुरेसा औषध साठा, सलाईन व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.मागाील वर्षी रूग्ण दाखल रुग्णांची संख्या ११दरवर्षी एप्रिल ते जून महिन्यात उन्हाचा पारा जास्त असतो. त्यामुळे या कालावधीत उष्माघाताचे रूग्ण आढळून येतात. मागील वर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण ११ रूग्ण मे महिन्यात दाखल झाले होते. यापैकी तिघांचा मृत्यू झाला. यंदा जिल्ह्यातील ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयात विशेष कक्ष सुरू केले आहेत. सध्या उष्माघाताचा रूग्ण उपचारासाठी दाखल झाला नाही.सध्या उन्हाचा पारा झपाट्याने वाढत चालला आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे रुग्ण याा दिवसांत आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. मात्र त्यांची पुरेशी व्यवस्था ग्रामीण भागात होत नाही. त्यामुळे आरोग्य केंद्रात विशेष कक्ष सुरू करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी व्यवस्था करीत आहेत.- सतीश हाडोळेआरोग्य सभापती, जि. प. अमरावती.ग्रामीण भागात मजूर वर्ग उन्हाळयात वाढत्या तापमानात कामे करतात. इतरही नागरिक उन्हाळ्याच्या दिवसांत काही कामामित्त बाहेर पडतात. मात्र या दिवसांत सुती कपडे, कानाला दुप्पटा, गॉगल्स लावूनच बाहेर पडावे. भरपूर पाणी, निंबू शरबत सेवन करावे व उन्हापासून शक्यतो बचाव करण्याचा प्रयत्न करावा.- संतोष माने अतिरिक्त डीएचओ.