शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी नोटांच्या नावे गंडविले; बॅगमध्ये निघाले रद्दी पेपर!

By प्रदीप भाकरे | Updated: July 29, 2024 17:28 IST

दर्यापूर शहरातील घटना : कोलकत्याच्या तीन भामट्यांविरूध्द गुन्हा

अमरावती  : विदेशी नोटा देण्याच्या नावावर एका व्यावसायिकाला बॅगमध्ये चक्क रद्दी पेपर देऊन ५० हजार रुपयांनी गंडविण्यात आले. ही घटना २८ जुलै रोजी दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिवकुमार (४०), राकेश (३५) व ५५ वर्षीय महिला (सर्व रा. कोलकता, पश्चिम बंगाल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.            

एफआयआरनुसार, दर्यापुरातील पंजाबराव कॉलनी येथील रहिवासी उमेश सुरेश गावंडे (३८) यांचे तेथेच सेतू व मिनी बँक ऑनलाइन सेंटर आहे. उमेश गावंडे हे रविवारी सेंटरवर असताना शिवकुमार नामक तरूण हा त्यांच्याकडे गेला. माझ्याकडे विदेशी नोटा आहेत, त्या भारतीय चलनात बदलून देता का, अशी विचारणा त्याने उमेश यांच्याकडे केली. उमेश यांनी त्याला होकार दिला. त्यानंतर शिवकुमार याचे साथीदार राकेश व एक महिला हे दोघे उमेश यांना भेटले. विदेशी नोटा देण्यासाठी त्यांनी उमेश यांच्याकडून ५० हजार रुपये रोख दिले. त्याचवेळी त्या दोघांनी उमेश यांना एक कॉलेज बॅग दिली. त्या बॅगमध्ये विदेशी चलनाच्या नोटा असल्याचे सांगून ते दोघे तेथून निघून गेले.

बॅग पाहताच झाली फसवणुकीची जाणिवआरोपी काही अंतरावर गेल्यानंतर उमेश गावंडे यांनी बॅग उघडून पाहिली. त्यात विदेशी नोटांऐवजी रद्दी पेपर असल्याचे त्यांना दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी दर्यापूर ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीDaryapurदर्यापूर