शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना मताधिकार, प्राधिकरणाने मागविल्या याद्या; ३१ डिसेंबर ‘डेडलाइन’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 18:16 IST

शासनाच्या नव्या नियमानुसार किमान १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतकºयाला बाजार समिती निवडणुकीत मताधिकार प्राप्त झाला. मतदार निकषबदलामुळे निवडणुकांची नवीन नियमावली सहकार विभागाने ६ नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली.

अमरावती : शासनाच्या नव्या नियमानुसार किमान १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतकºयाला बाजार समिती निवडणुकीत मताधिकार प्राप्त झाला. मतदार निकषबदलामुळे निवडणुकांची नवीन नियमावली सहकार विभागाने ६ नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली. आता याच निकषान्वये राज्यातील ३०१ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने २०१८ मध्ये निवडणुकीस पात्र असलेल्या बाजार समित्यांच्या मतदार याद्या प्राधिकरणाद्वारा मागविण्यात आल्या आहेत. पुणे बाजार समितीची निवडणूक यामध्ये विशेष चर्चिली जात आहे. या बाजार समितीचा कार्यकाळ १३ फेब्रुवारी २०१६ रोजी संपुष्टात आला; मात्र मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे येथील निवडणूक प्रक्रिया रखडली होती. ८ आॅगस्ट २०१७ ला निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे मत न्यायायाने नोंदविल्याने आता राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणद्वारा निवडणूक घेण्यापूर्वी मतदार यादी तयार करण्यात येणार आहे.  निवडणुकीस पात्र असलेल्या अन्य कृषिउत्पन्न बाजार समित्यांमध्येदेखील नव्याने मतदार याद्या करण्याची तयारी सुरू झालेली आहे. ज्या बाजार समित्यांचा कार्यकाळ पुढच्या वर्षी संपणार आहे, त्यांचा अहवाल सचिवांना ३१ डिसेंबरपूर्वी राज्य सहकारी प्राधिकरणाकडे सादर करावा लागणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर प्राधिकरणद्वारा १५ दिवसांत निवडणुकीस पात्र असलेल्या बाजार समित्यांची यादी प्रसिद्ध करणार आहेत व त्याच तारखेला शेतकरी मतदारसंघासाठी प्रत्येक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विद्यमान यादीमध्ये १५ समान गण विभाजन करण्यात येणार आहेत. प्रत्येक गणातून एक जागा निवडण्यात येणार आहे. शेतकरी मतदारसंघातील राखीव जागा लॉटरी पद्धतीने घोषित करण्यात येणार आहे. मतदार यादीतील नावे शेतकºयांच्या वर्णक्रमानुसार राहणार  आहे.

यादीची जबाबदारी जिल्हाधिका-यांकडे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात १० आर शेतजमीन धारण करणा-या व्यक्तीची शेतकरी मतदारसंघ नोंदणी राहील. संबंधित बाजार समिती सचिवाला व जिल्हा निवडणूक अधिकाºयाला बाजार समितीचा कार्यकाळ संपण्याच्या किमान १८० दिवस अगोदर गावनिहाय प्राथमिक यादी देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांची आहे. यानंतरच्या ३० दिवसांत सचिव प्रारूप मतदार यादी तयार करतील व ज्या शेतकºयांनी मागील पाच वर्षामध्ये  शेतमाल किमान तीन वेळा विक्री केला आहे, त्यांची नावे समाविष्ट करतील. 

उमेदवारीसाठी २१ वर्षांचा निकषजो शेतकरी संबंधित बाजार समितीच्या क्षेत्रात राहतो, त्याचे वय निवडणूक जाहीर झाल्याच्या दिवशी २१ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि त्याला जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांनी अधिनियमाद्वारे अपात्र केलेले नसावे तसेच त्याचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट असावे, तीच व्यक्ती शेतकरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास पात्र राहणार असल्याने यादी तयार करण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती