शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

देशात चौथी व्याघ्र प्रगणना २० जानेवारीपासून, जंगलाबाहेरसुद्धा मोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 18:00 IST

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण देहरादूनच्या निर्देशानुसार देशभरातील जंगलांमध्ये ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून वाघ व अन्य वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. ही प्रगणना २० जानेवारीपासून सुरू होऊन साधारणत: आठवडाभर चालणार आहे.

 - गणेश वासनिक 

अमरावती - राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण देहरादूनच्या निर्देशानुसार देशभरातील जंगलांमध्ये ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून वाघ व अन्य वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. ही प्रगणना २० जानेवारीपासून सुरू होऊन साधारणत: आठवडाभर चालणार आहे.देशात लोकसंख्या मोजण्यासाठी जनगणना केली जाते. त्याच पद्धतीप्रमाणे आणि त्यात जंगलाचे नियम लावून सन २०१३ नंतर देशात चौथी वाघ व अन्य प्राणीगणना २० ते २७ जानेवारीपर्यंत एकाच टप्प्यात होईल. या वन्यजीव प्रगणेत मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून डेटा संकलन आणि त्यांची नोंद डिजिटाईज करण्यात येईल. या प्राणी प्रगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील ४२ व्याघ्र प्रकल्प  याशिवाय प्रादेशिक वनविभाग, वनविकास मंडळांच्या जंगलातसुद्धा प्राणी प्रगणना होणार आहे. मात्र, वाघांच्या पायाचे ठसे घेण्यासाठी यापूर्वी पीआयपी ही पद्धत वापरली जात होती. ती आता असणार नाही. यामध्ये राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या निर्देशानुसार व त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे ही प्रगणना होत आहे. आॅनलाईन डेटा भरल्यानंतर प्रगणनेचे संकलन करून त्या-त्या राज्यांचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) ही माहिती देहरादून संस्थेला पाठवतील. त्यानंतर देशभरातील वन्यजीवांचा आकडेवारी समोर येईल. परंतु, याकरिता मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

ट्रॉन्झॅक्ट लाईन व प्रगणनेचे प्रशिक्षणदेशभरात होणा-या प्राणी प्रगणनेत अचूक माहिती मिळण्यासाठी देशभरातील वनाधिकाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. क्षेत्रीय वनाधिका-यांना प्रत्येक बीटमध्ये २ कि.मी. अंतराची सरळ ट्रॉन्झॅक्ट लाईन टाकून त्यावर ४०० मीटर अंतरावर १ ते १५ मीटरची व्यासाचे गोल डब्बे टाकून त्यामध्ये वनस्पती, गवत, झुडपे, वन्यजीवांच्या पाऊलखुणा, विष्ठा, मुत्र आदींचा अभ्यास करावा लागणार आहे. यासाठी जीपीएस एम. स्ट्राप्स ही प्रणाली उपयोगात आणली जात आहे. 

जंगलाबाहेर वन्यजीवांचा शोधदेशभरात एकाच वेळी होणा-या चौथ्या वन्यजीव प्रगणनेत जंगलासोबतच ज्या ठिकाणी जंगल नाही. मात्र, वन्यजीवांचे अस्तित्व आहे; अशा ठिकाणी शेती क्षेत्रातसुद्धा ही प्रगणना होईल. त्यामुळे या वन्यजीव गणनेला फार महत्त्व असणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने प्रगणना करण्याच्या कामाची युद्धपातळीवर तयारी सुरू झालेली असून वनांवर आलेला भार, नष्ट प्रजाती यांचे विश्लेषण या माध्यमातून होणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीforestजंगल