शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीतील 'मनरेगा'ची चार हजार कामे बंद, ८० हजार मजुरांवर 'उपासमारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:26 IST

Amravati : मेळघाटातील होळीचा बेरंग, कर्मचारी संपामुळे 'नरेगा'ची कामे प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : 'मनरेगा' योजनेचे कर्मचारी २७ जानेवारीपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे पाच दिवसांत जिल्ह्यातील ४०९७ कामे बंद पडली, याचा किमान ८० हजार मजुरांना फटका बसला. मेळघाटातील ३० हजारांवर मजुरांच्या होळीचा बेरंग होत आहे, तर सामाजिक वनीकरणातील रोपवाटिका, रोपलागवड आदी कामे ठप्प पडली आहेत. या संपामुळे रोजगार हमी योजनेची सर्व कामे सध्या बंद आहेत. फेब्रुवारी महिना सुरू झाल्याने शेतातील कामे कमी झाली आहेत. अशा वेळी मजूर मोठ्या आशेने रोहयोच्या कामांकडे वळतात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मस्टर काढण्यापासून ते मोजणीपर्यतची सर्व कामे थांबली आहेत. शिवाय मजुरांची मस्टर प्रदाने सुद्धा प्रलंबित आहेत.

चिखलदरा व धारणी तालुक्यांतील आदिवासी मजुरांना तातडीने मनरेगा योजनेचे काम उपलब्ध न झाल्यास स्थलांतर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी स्थिती आहे. संपामुळे वैयक्तिक लाभार्थी यांची कामे अर्धवट स्थितीत असून त्यांच्यामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

४०९७ कामांवरील ७९,५१४ मजूर कमी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कंत्राटी कर्मचारी यांचा २३ जानेवारीपासून संप सुरू असून जिल्ह्यात दैनिक मजूर उपस्थिती ९६२२२ व कामे ५९९८ सुरू होती व सद्यः स्थितीत १६५१८ मजूर कामांवर व फक्त १९०१ कामे सुरू आहेत. त्यामुळे ४०९७ कामे प्रभावित झाल्याने ७९,५१४ मजूर कमी झाले. त्यामुळे 'मनरेगा' योजनेची स्थिती गंभीर झाली आहे.

मेळघाटातील मजुरांवर उपासमारीची वेळ

मेळघाट आदिवासी मजुरांना मनरेगा योजनेच्या कामाव्यतिरिक्त उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नाही. संपामुळे मनरेगा कामे ठप्प झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आदिवासी बांधवांचा होळी हा महत्त्वाचा सण एक महिन्यावर आलेला आहे. मात्र संपामुळे निघालेले मस्टर ऑनलाइन करून त्यांची प्रदाने करणे अद्याप प्रलंबित असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ उद्भवली आहे.

रोपवाटिका सुकल्या, वृक्षलागवड प्रभावित

जिल्ह्यात मनरेगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वाधिक फटका सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिका व वृक्षलागवड कामांना बसला आहे. या ठिकाणी वृक्षलागवड कामांवर दररोज मजूर असणे आवश्यक आहे. मात्र संपामुळे मजुरांचे मस्टर निघत नाही. त्यामुळे मजुरांनी कामावर येणे बंद केले आहे. अशा परिस्थितीत रोपांचे व वृक्ष लागवडीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati's MNREGA Works Halt Due to Strike, Laborers Face Starvation

Web Summary : A strike by MNREGA workers in Amravati has halted over 4,000 works, impacting 80,000 laborers. Tribal workers in Melghat face potential starvation as crucial works are stalled, and wages are pending. The strike severely affects social forestry and individual beneficiary works, creating instability for the poor.
टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती