शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

११ महिन्यांत चार माता मृत्यू, २०० बालमृत्यू, पाच वर्षांच्या तुलनेत यंदाचे प्रमाण कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 18:54 IST

अमरावती : यंदा जिल्हा स्त्री रुग्णालयात यंदा ११ महिन्यांत चार मातामृत्यू व २०० बालमृत्यू झाल्याची नोंद आहे.

वैभव बाबरेकरअमरावती : यंदा जिल्हा स्त्री रुग्णालयात यंदा ११ महिन्यांत चार मातामृत्यू व २०० बालमृत्यू झाल्याची नोंद आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. डफरीन रुग्णालयातील आरोग्यसेवेत सुधारणांचा हा प्रभाव आहे.जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना योग्य आरोग्यसेवा पुरविण्यासाठी शहरात शासकीय रुग्णालये आहेत. ती कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असायचे.अनेकदा डॉक्टर व परिचारिकांवर हलगर्जीचे आरोप लागत होते. २०१७ मध्ये तुरळक घटनांवरून डॉक्टरांवर आरोप करण्यात आल्याचे आढळून आले आहे. एप्रिल २०१६ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत जिल्हा स्त्री रुग्णालयात १८ हजार ३७ महिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी ७ हजार ३८१ महिला प्रसूत झाल्यात. त्यांनी गोंडस बाळांना जन्म दिला. यामध्ये ४ हजार ३६२ महिलांची सामान्य प्रसूती झाली, तर २ हजार ६०६ महिलांचे सिझेरियन करण्यात आले. डफरीनमधील सुविधाजनक वातावरणामुळे व आरोग्य सेवेसंदर्भात पुरविल्या गेलेल्या विविध सुविधांमुळे यंदाचे माता व बालमृत्यूचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.पाच वर्षांची आकडेवारी२०१३-१४ मध्ये ९ हजार ९३८ महिला प्रसूत झाल्या. १३ मातामृत्यू व ५०७ बालमृत्यू झाले. २०१४-२०१५ मध्ये १० हजार ७२२४ महिला प्रसूत झाल्या. ७ मातामृत्यू व ३१८ बालमृत्यू झाले. २०१५-१६ मध्ये ११ हजार ८५ महिला प्रसूत झाल्या. ६ मातामृत्यू व १३२ बालमृत्यू झालेत. २०१६-२०१७ मध्ये १० हजार ४९२ महिला प्रसूत झाल्या. ६ मातामृत्यू व १९८ बालमृत्यू झाले.दररोज अडीचशे रुग्णांचा ओघडफरीन रुग्णालयात सहा वॉर्ड व २०० खाटांची व्यवस्था आहे. मात्र, दररोज अडीचशे रुग्णांचा येतात. त्यामुळे आरोग्य सेवा पुरविण्यात डॉक्टर व परिचारिकांची दमछाक होते. अनेकदा एकाच बेडवर दोन रुग्णांवरसुद्धा उपचार करावे लागते.

टॅग्स :Amravatiअमरावती