शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चार परवाने रद्द, ५४ निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 01:23 IST

औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चार मेडिकल स्टोअरचे परवाने रद्द करण्यात आले. ५४ परवाने निलंबित झाले, तर ६४ व्यावसायिकांना शो-कॉज नोटीस बजावण्यात आली आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी ६३१ मेडिकल स्टोअरच्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएफडीएची कारवाई : वर्षभरात ६३० मेडिकल स्टोअरची तपासणी, ६४ जणांना ‘कारणे दाखवा’

वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चार मेडिकल स्टोअरचे परवाने रद्द करण्यात आले. ५४ परवाने निलंबित झाले, तर ६४ व्यावसायिकांना शो-कॉज नोटीस बजावण्यात आली आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी ६३१ मेडिकल स्टोअरच्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.औषध प्रशासन विभागाकडे नोंदणीकृत परवानाधारकांची संख्या १ हजार ७८७ आहे. त्यामध्ये घाऊक ३९०, तर किरकोळ १ हजार ४५४ मेडिकल स्टोअर आहेत. औषधविक्री करणाºया या मेडिकल स्टोअरमध्ये नोंदवही, फार्मसिस्ट, औषधी खरेदी-विक्रीच्या नोंदी, फ्रीज, ग्राहकांना पावती आदी नियमावलींचे पालन करणे बंधनकारक असते. मात्र, अनेकदा मेडिकल स्टोअर संचालक त्या नियमांचे पालन करीत नाही. ही बाब तपासण्याची जबाबदारी औषध प्रशासन विभागाचे अधिकारी सांभाळतात. ते प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन तपासण्या करतात. औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सी.के. डांगे यांच्या मार्गदर्शनात औषध निरीक्षक उमेश घरोटे व मनीष गोतमारे यांनी एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान जिल्ह्यातील तब्बल ६३१ मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन नियमित तपासणी केली. त्यामध्ये गंभीर त्रुटी आढळून आलेल्या चार मेडिकल स्टोअरचे परवाने रद्द करण्यात आले, तर ५४ परवाने निलंबित झाले आहेत. ६४ मेडिकल स्टोअर संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई झालेल्या काही मेडिकल व्यावसायिकांनी वरिष्ठ स्तरावर अपिलसुद्धा केलेली आहे.३३ न्यायालयीन खटलेऔषधी प्रशासनाने आजपर्यंत केलेल्या विविध कारवायांतून ३३ न्यायालयीन खटले दाखल झाले आहेत. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

टॅग्स :medicineऔषधं