चौघांच्या टोळक्याकडून दीड तासात वाटमारीचा चौकार, पोलिसांकडून एकच एफआयआर

By प्रदीप भाकरे | Published: April 19, 2024 02:13 PM2024-04-19T14:13:01+5:302024-04-19T14:26:47+5:30

१८ एप्रिल रोजी चार जणांच्या टोळक्याने अवघ्या दिड तासात चौघांना लुटले. या चार घटनांप्रकरणी चार स्वतंत्र एफआयआरऐवजी गाडगेनगर पोलिसांनी सायंकाळी एकच एफआयआर नोंदविला.

Four incidents of robbery but One FIR by police: Four mobiles, gold and cash seized | चौघांच्या टोळक्याकडून दीड तासात वाटमारीचा चौकार, पोलिसांकडून एकच एफआयआर

Robbery

अमरावती: चार जणांच्या टोळक्याने अवघ्या दीड  तासात चौघांना लुटले. यात चार मोबाईल, सोन्याची पोथ व रोख रक्कम हिसकावण्यात आली. १८ एप्रिल रोजी दुपारी १२ ते दीड या कालावधीत ती जबरी चोरीची मालिका घडली. वाटमारीच्या या चार घटनांप्रकरणी चार स्वतंत्र एफआयआरऐवजी गाडगेनगर पोलिसांनी सायंकाळी एकच एफआयआर नोंदविला. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७.१२ च्या सुमारास याप्रकरणी, मंगेश किशोर वानखडे (३३, रा. कठोरा बू.) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार इसमांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.


फिर्यादी मंगेश वानखडे १८ एप्रिल रोजी दुपारी १२ डवरगाव येथून डिजेचे काम आटपवून राजपुत धाबा ते जकात नाका चौक रोडवरील देशमुख फार्म हाऊस जवळ आले. त्यावेळी अज्ञात तीन इसम त्यांच्या वाहनासमोर आले. पेट्रोल है क्या, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर सामने चलो पेट्रोल देता हु, असे वानखडे यांनी म्हटले असता त्यातील एका इसमाने त्यांच्या गाडीची चाबी काढली. एकाने वानखडे यांचा गळा पकडून ‘तेरे पास जो है वह निकाल’, असे म्हणून त्यांच्या पँन्टच्या खिशातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल व नगदी तीन हजार रुपये जबरीने काढून घेतले. जाताना ते त्यांच्या दुचाकीची चाबी घेऊन गेले.


सलग चार घटना

वानखडे यांच्यानुसार, नंतर त्याच तीन इसमांनी त्याच्या आणखी एका साथीदारासह वलगाव रोडस्थित रजनी मंगल कार्यालय येथे एका व्यक्तीला धमकावून त्याच्याकडील १० हजार रुपयांचा मोबाईल व महिलेच्या गळ्यातील ८ हजारांची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोथ जबरीने हिसकून घेऊन गेले. तसेच गाडगेनगरस्थित ठाकरे मेडिकलसमोर रोशन काळे नामक मुलगा मित्रासोबत मोटार सायकलने जात असतांना त्याच आरोपींनी मागून येऊन त्याच्या हातातील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल पळविला. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी जिल्हा स्टेडियम समोरुन पायदळ जात असलेल्या शंतनू वानखडे याच्याकडील १२ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. त्या मार्गाावरील सीसीटिव्ही तपासल्या जात आहेत.

दीड तासाच्या कालावधीमधील त्या चारही घटना आहेत. चारही घटना सारख्या असल्याने एकच एफआयआर नोंदविण्यात आला. जकात नाका चौक ते जिल्हा स्टेडियमपर्यंतच्या त्या घटना आहेत.

हनुमंत गिरमे, ठाणेदार, गाडगेनगर

Web Title: Four incidents of robbery but One FIR by police: Four mobiles, gold and cash seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.