लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोतवाली पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या दोन आरोपींनी वर्धा जिल्ह्यात महिलांचे मंगळसूत्र लुटल्याची कबुली दिली आहे. सूरज अशोक भोंगे (२२ रा.निंबोली, धामणगाव रेल्वे) व रोशन हरिदास चवळे (१९, रा.सुपलवाडा, चांदूर रेल्वे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी एका अल्पवयीनालाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन मंगळसूत्रांसह अमरावतीमधील चार दुचाकी जप्त केल्या आहेत.शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असताना कोतवाली हद्दीतील विविध ठिकाणावरून अनेकांच्या दुचाकी चोरी गेल्यात. दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकही धास्तावले. दरम्यानच नूरनगर येथील रहिवासी नईम खान अहमद खान (२६) यांची १४ डिसेंबर २०१९ रोजी एमएच २७ एपी ३९९७ या क्रमांकाची दुचाकी चोराने राजकमल चौकातील यशोदा दूध डेअरीसमोरून चोरी गेली. त्यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी आरोपींचे शोधकार्य सुरू केले असता, सूरज व रोशनसह अल्पवयीनाचे नाव पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी सूरज व रोशनला अटक केली. त्यांच्या माहितीवरून अल्पवयीनाला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दुचाकी चोरीच्या ४ गुन्ह्यांची कबुली दिली. सोबतच वर्धा जिल्ह्यातील दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकाविल्याचीही कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या ४ दुचाकी व २ मंगळसूत्र, असा एकूण दोन लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कोतवालीचे ठाणेदार शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उमक, नीलेश जुनघरे, जुनेद खान, आशिष विघे, इमरान खान यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मंगळसूत्र लुटारूंनी चोरल्या अमरावतीतील चार दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST
शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असताना कोतवाली हद्दीतील विविध ठिकाणावरून अनेकांच्या दुचाकी चोरी गेल्यात. दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकही धास्तावले. दरम्यानच नूरनगर येथील रहिवासी नईम खान अहमद खान (२६) यांची १४ डिसेंबर २०१९ रोजी एमएच २७ एपी ३९९७ या क्रमांकाची दुचाकी चोराने राजकमल चौकातील यशोदा दूध डेअरीसमोरून चोरी गेली.
मंगळसूत्र लुटारूंनी चोरल्या अमरावतीतील चार दुचाकी
ठळक मुद्देअल्पवयीन ताब्यात, दोघांना अटक : दोन लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त