शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील चार मोठे प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:28 IST

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार सिंचन प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर आहेत, तसेच नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८२.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देनऊ मोठ्या प्रकल्पांना ८२.८४ टक्के पाणीसाठा पश्चिम विदर्भात दमदार पाऊस

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गत तीन ते चार दिवसांपासून पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार सिंचन प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर आहेत, तसेच नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८२.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

अमरावती जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेला ऊर्ध्व वर्धा प्रकल्पांत ९३.९० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात सर्वाधिक ९६.६६ टक्के पाणीसाठा आहे. बेंबळा प्रकल्पात ९१.७२ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ८९.९० टक्के पाणीसाठा आहे. सदर चार प्रकल्प लवकरच शंभरी गाठतील, असा विश्वास जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची सुविधेचा प्रश्न मिटला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती प्रकल्पात ५५.३३ टक्के पाणीसाठा आहे. अकोेला जिल्ह्यातील वान सिंचन प्रकल्पात ४६.३७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ५९.८८ टक्के, पेनटाकळी ८२.६९ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात ७७.५७ टक्के पाणीसाठा आहे.

चार धरणातून नदीपात्रात विसर्गयंदा परतीचा दमदार पाऊस कोसळत असल्याने चार धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहेत. यामध्ये ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाच दरवाजे १५ सेंमीने उघडण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे २० सेंमीने उघडण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंमीटरने, तर खडकपूर्णा प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरण परिसरात काही हौशी पर्यटकांनीसुद्धा गर्दी केली आहे.आठ मध्यम प्रकल्पांनी गाठली शंभरीपश्चिम विदर्भातील २५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७६.०८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये आठ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे त्या त्या जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, बोरगाव, नवरगाव, वाशिम जिल्ह्यातील सोनल, एकबुर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील मस, उतावळी, अकोला जिल्ह्यातील मोर्णा आदी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. चार प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण