शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षक-वनपालांचे ‘तांत्रिक’ प्रश्न विधिमंडळात, धनंजय मुंडे यांचे तारांकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 15:57 IST

वनरक्षक-वनपालांकडून जंगलाचे संरक्षण करण्याखेरीज त्यांच्याकडून तांत्रिक कामे करून घेता येते का? याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्नांद्वारे शासनाला जाब विचारला आहे.

अमरावती - वनरक्षक-वनपालांकडून जंगलाचे संरक्षण करण्याखेरीज त्यांच्याकडून तांत्रिक कामे करून घेता येते का? याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्नांद्वारे शासनाला जाब विचारला आहे. वनकर्मचा-यांची बाजू मांडण्यासाठी मुंडे यांच्या सोबतीला विधानपरिषदेचे सहा सदस्य धावून गेले.वनरक्षक-वनपालांनी गत महिन्यात तांत्रिक कामांना नकार देत बेमुदत कामबंद आंदोलन करून एल्गार पुकारला होता. याप्रकरणी काही वनकर्मचाºयांचे निलंबन तर काहींना प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागले. मात्र, जंगलाचे संरक्षण ही वनरक्षक-वनपालांची मुख्य जबाबदारी असताना त्यांच्याकडून पीडीए व जीपीएस हाताळणे, पॉलिगॉन तयार करणे, फिरतीचे टॅग घेऊन जलयुक्त शिवार व वनयुक्त शिवार कामात वेग, टॅगिंग आदी तांत्रिक कामे करण्यात येत असल्याची बाब तारांकित प्रश्न क्रमांक ३८७६६ नुसार विधिमंडळात सादर केली. वनरक्षक- वनपाल हे पद तांत्रिक नसल्याचे कारण पुढे करून वरिष्ठ वनाधिकारी त्यांची वेतनश्रेणी वाढविण्यास चालढकल करीत असल्याची बाब यामाध्यमातून विधिमंडळात गाजणार आहे. वनकर्मचाºयांनी वेतनश्रेणीचा मुद्दा समोर करून व्याघ्र गणनेवर बहिष्कार टाकला होता, हासुद्धा प्रश्न चर्चिला जाणार आहे. वनरक्षक-वनपालांचे अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधार करून प्रोत्साहन व आहराभत्ता मंजूर करणे, कर्तव्यावर असल्यास कर्मचाºयांचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपये मदत जाहीर करणे, वन्यजीव विभागासाठी विशेष भत्ता लागू करणे आदी मागण्यांसंदर्भात वनकर्मचाºयांनी असहकार आंदोलनाचा इशार दिल्यामुळे ही बाब शासनाला विचारली जाणार आहे. वनरक्षक- वनपालांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनास जबाबदार अधिकारी कोण? याप्रकरणी चौकशी झाली काय? वेतनश्रेणीच्या प्रश्नबाबत शासनाची भूमिका काय? अशा विविध पैलुंनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह निरंजन डावखरे, नरेंद्र पाटील, हेमंत टकले, किरण पावसकर, सतीश चव्हाण, चंद्रकांत रघुवंशी या विधानपरिषद सदस्यांनी शासनाकडे वनकर्मचाºयांची कैफियत मांडली. राज्य विधिमंडळाच्या उन्हाळी अधिवेशनात वनपाल-वनरक्षकांचे समस्यांसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित झाल्याबाबत महसूल व वनविभागाचे कक्ष अधिकारी नितीन क्षीरसागर यांनी राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामान्य प्रशासन) यांच्याकडे ८ फेब्रुवारी २०१८ रोजी पत्र पाठवून यासंदर्भात इत्थंभूत माहिती मागविली आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग