शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वनरक्षकांनो खबरदार! आता संप कराल तर, वनविभागातील संघटना अनधिकृत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 17:58 IST

वेतनश्रेणी आणि तांत्रिक कामांवर बहिष्कार घालतानाच संप पुकारण्याचे धारिष्ट्य दाखविणा-या राज्यातील वनकर्मचा-यांना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. एखाद्या संघटनेच्या इशाºयावर संप करणे आता महागात पडणार असून वनविभागातील काही संघटना अनधिकृत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 - गणेश वासनिक अमरावती : वेतनश्रेणी आणि तांत्रिक कामांवर बहिष्कार घालतानाच संप पुकारण्याचे धारिष्ट्य दाखविणा-या राज्यातील वनकर्मचा-यांना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. एखाद्या संघटनेच्या इशाºयावर संप करणे आता महागात पडणार असून वनविभागातील काही संघटना अनधिकृत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.वनविभागात कार्यरत २७०० वनपाल आणि ९००० वनरक्षकांना महसूल व पोलीस दलातील समकक्ष पदाप्रमाणे वेतन नसल्याने गत वर्षापासून प्रशासन आणि वनकर्मचाºयांमध्ये असंतोष पसरला आहे. आॅन ड्युटी २४ तास असताना वेतन मात्र, अल्प यावरून गतवर्षी वनकर्मचाºयांनी ११ दिवसांचा संप पुकारला होता. मात्र, मुद्दा निकाली निघाला नाही. डिसेंबरमध्ये धरणे आंदोलन करताना राज्यात बहुतांश जिल्ह्यांतील वनकर्मचाºयांनी त्यांच्याकडे असलेले पीडीए मोबाईल, लॅपटॉप, जीपीएस हे यंत्र कार्यालयात जमा केले. राज्य शासनाच्या महत्वकांक्षी १३ कोटी वृक्षलागवडीवर कर्मचाºयांनी बहिष्कार घालण्याच्या हालचाली सुरू केल्याने वन प्रशासनाची झोप उडाली आहे. भविष्यात वनकर्मचारी आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेता वन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.आर. मंडे यांनी पत्र काढून शासन परिपत्रक कार्यासन (६ अ) २ जानेवारी २०१७ प्रमाणे वनविभागातील संघटना मान्यताप्राप्त नसल्याने अशा संघटनांची दखल वा पत्र स्वीकारण्यात येऊ नये, असे निर्देश मंडे यांनी राज्यातील सर्व वनाधिकाºयांना दिले आहे.शासन निर्णय क्र. एमएससी २००४/प्र.क्र. २१ (भाग- ३) ४ आॅगस्ट २०१४ नुसार वनविभाग संगणकीकरण करणेबाबत निर्णय नसताना त्यामुळे तांत्रिक कामाकरिता शासनाने दिलेले पीडीए मोबाईल, जीपीएस, लॅपटॉप, वनरक्षक-वनपाल वापरण्यास मनाई करू शकत नाही, असे केल्यास शासनाचा अवमान समजून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

संप केल्यास खबरदारमहाराष्ट्र  नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम ६ (दोन) नुसार शासकीय कर्मचाºयांना नोकरी संबंधित कोणत्याही मागणी, वेतनासाठी संप, आंदोलन करण्याचा अधिकार नसून संपासाठी कर्मचाºयांना कोणत्याही संस्था किंवा संघटनांनी प्रोत्साहन देऊ नये, असे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी नमूद करून एकप्रकारे वनरक्षकांना इशारा दिला आहे.

हे आहेत वनरक्षकांचे प्रश्नआठ तास सेवा बजावणे, बीट बाहेरील कामे न करणे, तांत्रिक कामे पार न पाडणे, साप्ताहिक रजेच्या दिवशी काम न करणे, बीट मदतगार मिळावे, अन्यथा जंगलातील गस्त बंद करणे आदी प्रश्नांबाबत वनकर्मचाºयांनी एल्गार पुकारला आहे. मात्र, ज्या संघटनांच्या इशाºयावर वनरक्षक-वनपालांनी संप, आंदोलन, असहकार करण्याचा निर्णय घेतला, त्या संघटना शासनमान्य नसल्याचा खुलासा वनविभागाने केल्याने आता वनकर्मचा-यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती