शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

वने विभागाच्या सुवर्ण पदक विजेत्या आरएफओला ४० दिवसांतच निलंबन

By गणेश वासनिक | Updated: June 6, 2025 13:12 IST

Amravati : वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना गौरविल्यानंतर शासनाला झाली उपरती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वने आणि वन्यजीव संवर्धनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दि. २१ मार्च २०२५ रोजी वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सुवर्ण पदकाने गौरवण्यात आलेल्या महिला आरएफओला अवघ्या ४० दिवसांत निलंबित करण्यात आले आहे. स्नेहल अवसरमल वनक्षेत्रपाल (प्रादेशिक) नवापूर, धुळे असे निलंबित करण्यात आलेल्या आरएफओचे नाव आहे.

धुळे जिल्ह्यातील नवापूर येथील प्रादेशिक वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत असलेल्या स्नेहल अवसरमल यांच्यावर शासकीय कर्तव्यात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि वित्तीय अनियमितता केल्याचे आरोप आहेत. यासंदर्भात धुळेचे प्रादेशिक वनसंरक्षक (प्रादेशिक) निनू सोमराज यांनी दि. ३० मे २०२५ रोजी त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.

शासन, निवड समितीच्या लक्षात का आणून दिले नाही?

  • महसूल व वनविभागाच्या राज्यस्तरीय पदक निवड समितीची बैठक प्रधान सचिव (वने) यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडली होती. या बैठकीत सन २०२०-२०२१, २०२१-२०२२ आणि २०२२-२०२३ या वर्षात प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून वर्षनिहाय पदकांसाठी ७९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांची शिफारस केली होती.
  • यात आरएफओ स्नेहल अवसरमल यांची वन, वन्यजीव संरक्षणात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन २०२२-२०२३ या वर्षासाठी सुवर्णपदकासाठी निवड करण्यात आली होती.

 

फेब्रुवारीत चौकशी समिती गठित, मार्चमध्ये सुवर्णपदक

  • नवापूरच्या वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांच्या संदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने २४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली होती.
  • आरएफओ अवसरमल यांनी नवापूर प्रादेशिकमध्ये २६ लाख ६१ हजार २३० रुपये, तर रोहयोत १८ लाख ४६ हजार ९२ रुपये असे एकूण मिळून ४५ लाख १७ हजार ३२२ रुपयांची अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

प्रस्ताव तपासला कुणी? वनविभागात मुख्य वनसंरक्षकांकडूनउत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावांची पुरस्कारासाठी शिफारस मागविली जाते. या शिफारशीनुसार गोपनीय अहवाल, सचोटी, चारित्र्य, तांत्रिक कार्यक्षमता, बुद्धिमत्ता व त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आदींचा विचार करून पदके प्रदान करण्यासाठी निवड समिती ठरविते. असे असताना स्नेहल अवसरमल यांचा प्रस्ताव तपासला कुणी? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती