राज्यात वनविभागाला उशिरा आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:20+5:302021-08-29T04:16:20+5:30

फोटो : २८एएमपीएच०१ फोटो - वन विभागाने प्रसिद्ध केलेली हीच ती सन्मान पुस्तिका गणेश वासनिक अमरावती : हरिसाल येथील ...

The forest department in the state woke up late | राज्यात वनविभागाला उशिरा आली जाग

राज्यात वनविभागाला उशिरा आली जाग

Next

फोटो : २८एएमपीएच०१

फोटो - वन विभागाने प्रसिद्ध केलेली हीच ती सन्मान पुस्तिका

गणेश वासनिक

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने राज्याच्या वनविभागाला मोठा हादरा बसला आहे. त्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न म्हणून आता वनविभागाने महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘सन्मान’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी एकट्या मेळघाटात महिला कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याची चार-पाच प्रकरणे उघड झाली. दुसरीकडे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येला कारणीभूत ठरविलेले आरोपी कोठडीतून बाहेर पडले आहेत.

राज्याचे वन बलप्रमुख पी. साईप्रसाद यांच्या पुढाकारानेहा उपक्रम राबविला जाणार असून, महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. २५ मार्च २०२० रोजी दीपाली यांनी आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण वनविभागावर ताशेरे ओढण्यात आले. धारणी पोलिसांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर फौजदारी कारवाईसह निलंबनाची कारवाई केली. यापैकी विनोद शिवकुमारचा जामीन मंजूर झाला, तर रेड्डी यांच्यावरील याच प्रकरणाशी संबंधित फौजदारी गुन्हा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला.

एका महिला आरएफओला वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागली, हा डाग वनविभाग कदापिही पुसून काढू शकणार नाही, याचे शल्य वनविभागात कार्यरत महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना आहे. यामुळेच की काय, वन बलप्रमुख पी. साईप्रसाद यांनी ‘सन्मान’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वनविभागात कर्तव्यावर असलेल्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर करणे, सुरक्षित वातावरण आणि हक्काची जाणीव निर्माण करणे ही या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत.

या बाबीला असेल प्राधान्य

- महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमांची अंमलबजावणी

- वनविभागाच्या परिपत्रकानुसार महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण

- कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करणे

- महिलांना हक्काची जाणीव करून देणे

- प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे

- महिलांना लागू असलेल्या विशेष रजा मंजूर करणे

महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सशक्तीकरण आणि त्यांना समानता मिळवून देण्यासाठी ‘सन्मान’ उपक्रम राबविला जाणार आहे. या माध्यमातून महिलांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात येईल. वरिष्ठांकडे आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्याासाठी विशेष कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

- पी. साईप्रसाद, वन बलप्रमुख, वनविभाग, नागपूर

Web Title: The forest department in the state woke up late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.