शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

चंद्रमौळी झोपडीत अन्न सुरक्षेचा लाभ!

By admin | Updated: January 19, 2016 00:09 IST

मागिल २५ वर्षांपासून अतिक्रमित जागेवर उभारलेल्या चंद्रमौळी झोेपडीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या पालघर कुटुंबांना ...

प्रतीक्षा २५ वर्षांची : बच्चू कडूंचे प्रयत्न, पुनर्वसन करणारनरेंद्र जावरे  परतवाडामागिल २५ वर्षांपासून अतिक्रमित जागेवर उभारलेल्या चंद्रमौळी झोेपडीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या पालघर कुटुंबांना शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ व रेशन कार्ड सारखे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आ. बच्चू कडू यांच्या हस्ते देण्यात आलेत.परतवाडा शहरातील अंजनगाव स्टॉपवर शासकीय जागेवर मागील २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून मदारी, मोघ्या या विमुक्त भटक्या जमातीच्या नागरिकांनी बस्तान मांडले आहे. मध्य प्रदेशसह इतर राज्यातील ते मूळ रहिवासी असले तरी त्यांना शासकीय सुविधांचा कुठलाच लाभ देण्यात आला नाही. परिणामी जवळपास ६२ कुटुंबातील २०० वर सदस्य शासन योजनेपासून वंचित असल्याचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या लक्षात आले. त्यांनी या चंद्रमौळी झोपडीत उघड्यावर जीवन कंठणाऱ्या कुटुंबांची संपूर्ण माहिती मागवली. अन्न सुरक्षेतून धान्य वाटपशासन रेशनकार्ड धारकांना कमी दरात गहू, तांदूळ, साखर आदी धान्य पुरविते. मात्र, मागील २५ वर्षांपासून उघड्यावर बस्तान मांडलेल्या या कुटुंबांची शासन दप्तरी नोंदच नव्हती. त्यामुळेच ते अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित होते. अचलपूरचे तहसीलदार मनोज लोणारकर यांनी या संपूर्ण कुटुंबांची माहिती मागवून यादी तयार केली. त्यांना सर्वप्रथम अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्याचे आ. कडू यांनी सांगितले. त्यानुसार त्यांचे रेशनकार्ड बनविण्यात आले. त्यानंतर २ रूपये प्रतिकिलो दराने गहू, तीन रूपये प्रतीकिलो तांदूळप्रमाणे धान्याचा ६२ पैकी १४ कुटुंबांना लाभ देण्यात आला. मतदानाचा अधिकारही बजावणार!२५ वर्षांपासून यातील अनेक कुटूंब मतदानापासून वंचित असल्याची बाब उघडकीस येताच त्यांचे रेशनकार्ड, आधार कार्ड, शून्य रकमेवर बँक खाते काढण्यात आले. त्यांना मतदान कार्डचे वितरणही करण्यात आले. आता हे वंचित मतदानाचा हक्कही बजावतील. मुलांचा शाळेत दाखलाभटक्या समाजातील हे नागरिक गावोगावी पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकंती करीत असात. पाठीवर बिऱ्हाड असल्याने यांची मुले शिक्षणापासून वंचित असल्याची बाब पुढे आली. ही शाळाबाह्य मुले असली तरी त्यांची नावे वेगवेगळ्या शाळांमध्ये दाखल असून मुले शाळेत न जाता भंगार, प्लास्टिक गोळा करताना आढळतात. या मुलांना आता दररोज शाळेत पाठविण्याची अट घालण्यात आली आहे. अनेकांची नावे नव्याने शाळेत दाखल करण्यात आलीत.सार्वजनिक नळ, पुनर्वसनाच्या हालचाली२५ वर्षांपासून मध्यवस्तीतील अंजनगाव स्टॉप परिसरात भटक्यांची वस्ती आहे. त्यांच्या झोेपडीपर्यंत आजवर कुणाचीच नजर गेली नाही. परिणामी वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधाही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. आ.कडुंच्या प्रयत्नातून त्यांना आता या सुविधा मिळणार आहेत. तुर्तास पालिकेला तहसील प्रशासनाने सार्वजनिक नळ देण्याचे पत्र दिले आहे. शासनाच्या सहकार्याने त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.