शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती शासकीय रुग्णालयात अन्नधान्य घोटाळा ! आठ वर्षांपूर्वीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 11:08 IST

Amravati : रुग्णालयांना मागविला पुरवठ्याचा तपशील

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शासकीय रुग्णालयात अन्नधान्य पुरवठ्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आठ वर्षांपूर्वी झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीसाठी २२ नोव्हेंबरला अकोला मंडळात येणाऱ्या अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला व यवतमाळ जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांना आरोग्य सेवा आयुक्त कार्यालयाने अन्नधान्य पुरवठ्याचा तपशील, तसेच रुग्णालयांची नावे पत्ता तेथील संबंधित अधिकाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये अन्नधान्य पुरवठ्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार २० फेब्रुवारी २०१६ रोजी तत्कालीन आमदार स्व. सरदार तारासिंह यांनी केली होती. यामध्ये पुरवठादारांनी कक्ष अधिकारी ते प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याशी संगनमत करून कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीनंतर संबंधित गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत पुरवठादारांची थकीत बिलेदेखील थांबविण्यात आली होती. या प्रकरणातील पुढील चौकशीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग मुंबई अप्पर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभागाला १९ नोव्हेंबर २०२४ रोजी माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य सेवा आयुक्तालयाने अकोला मंडळातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हा शल्यचिकित्सक यांना २२ नोव्हेंबरला अन्नधान्य गैरव्यवहाराच्या अनुषंगाने सर्व रुग्णालयांचा तपशील मागविला आहे.

गीताई महिला बचत गटाकडून झाला होता पुरवठा अकोला मंडळांतर्गत अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांना चांदूर बाजार येथील गीताई महिला बचत गट औद्योगिक सहकारी संस्थेकडून अन्नधान्य, तसेच इतर वस्तू पुरवठा करण्यात आला आहे. या संस्थेकडून पुरवठा झालेल्या सर्वच रुग्णालयांचा तपशील मागविण्यात आला आहे.

"२०१६ या वर्षामध्ये झालेल्या अन्नधान्य पुरवठ्यातील गैरव्यवहाराच्या अनुषंगाने रुग्णालयांचा तपशील मागविण्यात आला आहे. हा तपशील गोळा करणे सुरू आहे. यासंदर्भातील माहिती सर्व रुग्णालयांना मागविली आहे. हा तपशील प्राप्त होताच पाठविण्यात येईल." - डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :fraudधोकेबाजीAmravatiअमरावतीhospitalहॉस्पिटल