शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन गेमचा लागला नाद; अन् त्याने घातली यमाला ‘साद’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 12:55 IST

ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने एका २५ वर्षीय युवकाने आत्मघात केल्याची माहिती  अमरावती पोलिसांनी दिली. सागर जानराव सोनुले (२५, रा. वाडेगाव, वरूड) असे मृताचे नाव आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क     अमरावती : लगतच्या माळू नदीच्या पुलावरून एका २५ वर्षीय युवकाने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना २० जुलै रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने त्याने आत्मघात केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. सागर जानराव सोनुले (२५, रा. वाडेगाव, वरूड) असे मृताचे नाव आहे.

सागर हा बँकेत काम करीत असून तो ऑनलाइन गेम मध्ये पैसे हारला असल्याचे समजते. पैसे हरल्यामुळे तो नेहमीच विवंचनेत राहत होता. १८ जुलै रोजी त्याने मोर्शी लगत असलेल्या माळू नदीच्या पात्रात रात्री ११ वाजताचे सुमारास उडी घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी महसूल विभागाला याबाबतची माहिती दिली. तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क केला.

             १९ जुलै रोजी सागरचे नातेवाईक माळू नदीच्या पुलावर शोध घेण्यासाठी आले असता त्यांना सागरची दुचाकी गाडी व चपला आढळून आल्या. पोलीस पथक व जिल्हा बचाव पथकाच्या वतीने शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, सागरचा मृतदेह आढळून आला नाही. २० जुलै रोजी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आल्यावर सागरचा मृतदेह माळू नदीच्या जुन्या पुलाच्या बाजूने वाहत्या पाण्याच्या दिशेने फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतकावर शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :onlineऑनलाइनDeathमृत्यू