शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अश्रूंची झाली फुले; रक्तदानाने जागवल्या इब्राहिमच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 05:00 IST

व्हॅलेंटाईन वीकमधील १३ फेब्रुवारी हा तिवस्याचा इब्राहिम पठाणचा वाढदिवस. ३१ जुलै २०२१ रोजी त्याचे अकाली निधन झाले. यंदा तो आपल्यात नाही. त्यामुळे त्याच्या स्मृतीनिमित्त नव्हे तर, त्याच्या मृत्युपश्चात पहिल्या वाढदिवसाला १३ फेब्रुवारी रोजी त्याची आई बुशरा पठाण यांनी आध्यात्मिक गुरुकुंज आश्रम येथे रक्तदान शिबिराची कल्पना प्रत्यक्षात उतरविली.  डझनावरी लोकांनी इब्राहिम या जगी नसताना त्याच्या १७ व्या वाढदिवशी स्वेच्छेने रक्तदान केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : व्हॅलेंटाईन डे आला की, अनेकांच्या मनात प्रेम व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या कल्पना जन्म घेतात. प्रेम ही निरागस, निरामय, व्यापक भावना. व्हॅलेंटाईन म्हणजे केवळ प्रियकर अन् प्रेयसीमधलेच प्रेम नव्हे, ते कुठल्याही नात्यात बहरू शकते.  व्यक्त होऊ शकते. गुरुकुंज मोझरी येथील एका ‘माय’ने आपल्या मुलाच्या संकल्पपूर्तीकडे वाटचाल करून त्याचा प्रत्यय दिला आहे. गेल्या वर्षीच त्या ‘माय’च्या प्राणप्रिय असलेल्या ‘इब्राहिम’ने अकाली एक्झिट घेतली. व्हॅलेंटाईन वीकमधील १३ फेब्रुवारी हा तिवस्याचा इब्राहिम पठाणचा वाढदिवस. ३१ जुलै २०२१ रोजी त्याचे अकाली निधन झाले. यंदा तो आपल्यात नाही. त्यामुळे त्याच्या स्मृतीनिमित्त नव्हे तर, त्याच्या मृत्युपश्चात पहिल्या वाढदिवसाला १३ फेब्रुवारी रोजी त्याची आई बुशरा पठाण यांनी आध्यात्मिक गुरुकुंज आश्रम येथे रक्तदान शिबिराची कल्पना प्रत्यक्षात उतरविली.  डझनावरी लोकांनी इब्राहिम या जगी नसताना त्याच्या १७ व्या वाढदिवशी स्वेच्छेने रक्तदान केले. वयाच्या सोळाव्या वर्षी एक फाउंडेशन स्थापन करून इब्राहिमने २० हजार झाडे लावण्याचा संकल्प केला होता. त्याने २९ जुलै २०२१ पर्यंत त्याने १८ हजार झाडे लावलीही. मात्र, ३१ ऑगस्टला त्याचे प्राणपाखरू उडाल्याने तो संकल्प तडीस नेण्याचा वसा त्याचा भाऊ ताहिर पठाणने  घेतला. पूर्णही केला. त्या दोन हजार झाडांचे संवर्धन ताहिर करणार आहे. ग्रामगीतेचे उर्दू भाषेत रुपांतरइब्राहिमची आई बुशरा पठाण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता या लोकग्रंथाचे उर्दू भाषेमध्ये भाषांतर केले आहे. त्यांच्या डोक्यातही राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज यांचे श्लोक रमले आहेत. इब्राहिम वयाच्या १३व्या वर्षी स्काऊट शिबिरासाठी अमेरिकेत जाऊन आल्याची आठवण बुशरा यांनी जागविली.

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी