ग्रामपंचायत कार्यालयात आरती राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उर्दू शाळेमध्ये मंगेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राथमिक शाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पोलीस पाटील सुनील अलोने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डेबू संत्रा उत्पादक बचत गट व स्व. गोपाळराव बहुउद्देशीय संस्था मारुती महाराज चौक येथे अनुक्रमे माजी सैनिक अरुण धाकडे व पोस्टमास्तर राजू काटोलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्व. गोपाळराव बहुद्देशीय संस्था, डेबू संत्रा उत्पादक बचत गट यांच्यामार्फत कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस पाटील सुनील अलोने, आशा सेविका लता चव्हाण व रुग्णवाहिका चालक अमोल शेळके यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपसरपंच अशोक अलोने, ग्रामपंचायत सदस्य अवधूतराव नवाळे, अनुपमा ठाकरे, नीता मेश्राम, सुनील कोठाळे, नौशाद अहमद यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले, वीर भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून व कोरोना नियमाचे पालन करून कार्यक्रम पार पडला. यशस्वी करण्याकरिता संत्रा उत्पादक बचत गटाचे सदस्य प्रफुल नवघरे, प्रमोद बुंटे योगेश पात्रे, अतुल राऊत, सुनील मोहोळ, अमोल शेळके, सुमीत प्रफुल सोलो, छोटू नवघरे, मयूर देशमुख, मंगेश शेळके, आदित्य ठोकळ, गौरव राऊत, सतीश घांसडे अतुल ठाकरे. अविनाश बायस्कर, गजानन ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.