शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

मेळघाटातील विविध समस्या तात्काळ मार्गी लावा - के.सी. पाडवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 14:03 IST

नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीला विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, उपवनसंरक्षक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चिखलदरा (अमरावती) : मेळघाटातील आदिवासींचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करा. सुविधांअभावी त्यांना पुन्हा जंगलात यायला नको. या भागातील विविध समस्या तात्काळ समन्वयातून मार्गी लावा, असे निर्देश नागपूर येथील आढावा बैठकीत आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी अधिका-यांना दिले. धारणीत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, इतर प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, काटकुंभ परिसरासाठी कोयलारी येथे नवीन वीज उपकेंद्र आदी महत्त्वाचे मुद्दे गुरुवारी झालेल्या बैठकीत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आदिवासी विकास मंत्र्यांपुढे मांडले. 

नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीला विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, उपवनसंरक्षक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धारणी येथे उपजिल्हा रुग्णालय निर्मितीपासून केवळ ५० खाटांचे आहे. त्याची क्षमता आता शंभर खाटांची करावी. तज्ज्ञ डॉक्टरांसह आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तात्काळ उपलब्ध करावी, असे आदेश ना. पाडवी यांनी दिले.

प्रकल्प कार्यालयाच्या निर्मितीपासूनच १०० असलेली वसतिगृहांची पटसंख्या शंभरवरून दोनशे करण्यास मान्यता देत सुविधा पुरवण्याचे आदेश देण्यात आले. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामसेवक, नर्स, कृषिसहायक आदी प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी वेगळे वसतिगृह तात्काळ सुरू करा. इमारत नसेल, तर भाडेतत्त्वावर घ्या. आदिवासींचे स्थलांतर होऊ नये, यासाठी वनविभागांतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचे ना. पाडवी यांनी सुचविले.

मध्य प्रदेशातून ३३ केव्ही पुरवठा, सर्व गावांना वीज  चिखलदरा तालुक्यातील जारिदा, काटकुंभ परिसराला मध्यप्रदेशातून होणारा ११ केव्ही विद्युत पुरवठा ६० गावांसाठी अपुरा आहे. आता येथे नवीन उपकेंद्राची निर्मिती करून ३३ केव्ही पुरवठा सुरू करण्यासंदर्भात महावितरणने तात्काळ हालचाली कराव्यात. वर्ष संपत असताना महावितरणकडे विकासकामांचा कोट्यवधींचा निधी पडून असल्याबाबत मंत्र्यांनी संताप व्यक्त केला. मेळघाटातील ज्या गावांमध्ये अद्यापही वीजपुरवठा पोहोचला नाही, ती सर्व गावे तीन महिन्यांत प्रकाशमान करण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्र्यांनी दिले. मेळघाटातील रस्ते, वीज, वसतिगृह, उपजिल्हा रुग्णालय, पुनर्वसन या मुद्द्यांवर आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन करण्यात आले होते. यासंदर्भात त्यांनी संबंधित अधिकाºयांना आदेश दिले आहेत. - राजकुमार पटेल, आमदार मेळघाट विधानसभा

टॅग्स :Amravatiअमरावती