शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमध्ये आणखी पाच पॉझिटिव्ह; एकूण ६०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 18:47 IST

अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी ६० वर गेली आहे. येत्या ९ आणि १० मे या शनिवार व रविवारी जिल्ह्यात जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

ठळक मुद्देप्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन दिवस जनता कर्फ्यू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी ६० वर गेली आहे. येत्या ९ आणि १० मे या शनिवार व रविवारी जिल्ह्यात जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या दरम्यान जिल्ह्यातील सर्व सेवा, प्रतिष्ठाने बंद राहतील असे त्यांनी सांगितले आहे.येथील क्लस्टर हॉटस्पॉटमध्ये चार व ग्रामीणमध्ये एक अशा पाच रुग्णांचे थ्रोट स्वॅब अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या ६० वर पोहोचली आहे. यामध्ये १० मृत, ५ कोरोनामुक्त, तर ४५ व्यक्तींवर उपचार सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी येत्या शनिवार व रविवारी जनता कफ्यूर्चे आवाहन केले आहे.जिल्हा आरोग्य यंत्रणेला सोमवारी ७८ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ५ पॉझिटिव्ह व ७३ निगेटिव्ह आहेत. जिल्हा ग्रामीणमध्ये अमरावती तालुक्यातील शिराळा येथे बाधिताच्या संपकार्तील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. येथील क्लस्टर हॉटस्पॉटमधील हनुमाननगरात दोन व्यक्ती, खोलापुरी गेट येथील एक व्यक्ती व हबीबनगरात १३ वर्षांच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. हबीबनगरात नव्याने कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, तर अन्य चार कोरोनाग्रस्त हे बाधिताच्या संपर्कात असल्याने संस्थात्मक विलगीकरणात होते. त्यांना आता कोविड रुग्णालयातील दुसºया माळ्यावरील कोविड कक्षात दाखल केले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.दोन दिवस सर्व सेवा बंदकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीच्या उपायासाठी येत्या शनिवारी व रविवारी जनता कफ्यूर्चे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या काळात रुग्णालय व मेडिकल वगळता सर्व सेवा बंद राहणार आहे. कोरोनाचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी सर्वांनी घरात सुरक्षित राहावे व दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस