जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : खोट्या पावत्या लावणे भोवलेअमरावती : विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणे व खर्चा संदर्भात खोट्या पोचपावत्या सादर केल्याचे सिद्ध झाल्याने चांदूर बाजार तालुक्यामधील रतनपूर (सायखेड) ग्रापंच्या पाच सदस्यांना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गुरुवारी अपात्र घोषित केले. पाच वर्षाच्या कालावधीसाठी त्यांना निवडणूक लढविता येणार नाही. रतनपूर ग्राम पंचायतीचे मंगला प्रमोद धाकडे, प्रमोद उत्तमराव धाकडे, शकुंतला धामदास ढोवळे, किरण वैकुंठराव ढोबळे, शीला अनिल जवंजाळ यांच्यावर अपात्रतेची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी केली. याच गावातील प्रफुल्ल वामनराव ढोबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ब अंतर्गत विवाद अर्ज दाखल केला होता.पोचपावत्या खोट्याअमरावती : या प्रकरणात अर्जदार व गैरअर्जदाराचे अभियोक्ता यांनी युक्तिवाद केला. तसेच चांदूरबाजार तहसीलदार यांनी अहवाल सादर केला. यामध्ये रतनपूर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सन २०१२ मध्ये घेण्यात आली व ग्राम पंचायत खर्च सादर केल्याविषयी गैरअर्जदारांच्या निवडणूक खर्चाचे हिशोबाची दप्तरी तपासणी केली असता कोणतेही दस्तावेज आढळले नाही. मात्र अर्जदारांनी निवडणूक खर्चाचे पोचपावत्या लावल्यात व १६ डिसेंबरचे युक्तीवादात निवडणूक खर्चा सादर केला. परंतु पोचपावत्या घेतल्या नसल्याचे नमूद केले. यावरुन निष्कर्ष असे निघतात की गैर अर्जदारांनी प्रकरणात लावलेल्या पोचपावत्या ह्या खोट्या असल्याचे सिद्ध होते व विहित मुदतीत निवडणूक खर्चाचे हिशोब सादर केले नाही, असे निर्विवादपणे स्पष्ट होते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. इंदला ग्रा.पं.चे उपसरपंच अपात्र तीन अपत्य असल्याचे कारणावरुन अमरावती तालुक्यामधील इंदला ग्रामपंचायतीचे उपसरपंच अय्यास खान मीर मोहम्मद खान यांना अप्पर जिल्हाधिकारी के. आर. परदेशी यांनी अपात्र घोषित केले
रतनपूर ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र
By admin | Updated: January 9, 2016 00:33 IST