शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत लॉर्डस हॉटेल पेटविले, मालकाची पोलिसांत तक्रार    

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 21:42 IST

जुना बायपासवरील एमआयडीसी स्थित हॉटेल लॉर्डसला सोमवारी पहाटे ४.३० वाजता लागलेल्या भीषण आगीत साहित्य जळून खाक झाले.

अमरावती : जुना बायपासवरील एमआयडीसी स्थित हॉटेल लॉर्डसला सोमवारी पहाटे ४.३० वाजता लागलेल्या भीषण आगीत साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तास श्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, रात्री ८ च्या सुमारास लॉर्ड्स हॉटेलचे मालक महेश छाबडा यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठून तीन तरुणांनी हॉटेल पेटविल्याची  तक्रार दिली.  एमआयडीसी स्थित दोन इमारतींचे हॉटेल लॉर्डस हे महेश छाबडा व संजय छाबडा यांच्या मालकीचे आहे. सोमवारी पहाटे ४.४५ वाजता आग लागल्याच्या माहितीवरून अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी तेथील फॅमिली रेस्टॉरेंटमधून आगीचे लोळ निघत होते. अग्निशमनने पाच बंब आणि तीन तास खर्ची घातल्यानंतर आग आटोक्यात आली. या आगीत हॉटेल लॉर्ड्समधील महागडे साहित्य जळून खाक झाले. घटनेच्या अनुषंगाने हॉटेलमालक महेश छाबडा यांनी रात्री राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली. पहाटे ४ वाजता हॉटेलजवळील मार्गावर तीन तरुणांच्या हालचाली संशयास्पद होत्या. ते हल्ला करतील म्हणून मी थेट हॉटेल गाठले. त्यावेळी हॉटेलला आग लागली होती. मागील दार तुटलेले होते. या तरुणांनी हॉटेलला आग लावली; त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार महेश छाबडा यांनी पोलिसांत नोंदविली. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

तीन जणांनी हॉटेल पेटविल्याची तक्रार मालकाने दिली आहे. त्यानुसार सीसीटीव्हीची पाहणी करू. व्हेरीफाय करून कारवाई केली जाईल. - किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती