शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल ग्रँड महफीलला आग लागल्यानं खळबळ; आग विझवण्यासाठी आलेल्या बंबाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 22:10 IST

अग्निशमन दलाच्या बंबाला पार्किंगमध्येच अपघात होऊन चालक गंभीर जखमी

अमरावती : कॅम्पस्थित हॉटेल ग्रँड महफीलच्या सहाव्या मजल्यावरील डक्टिंगला गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता आग लागली. ती विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या बंबाला पार्किंगमध्येच अपघात होऊन चालक गंभीर जखमी झाला. त्यामुळे पेच आणखी वाढला. टेरेसवर आगीचे लोळ उठत असल्याचे लॉनमध्ये स्वागत समारंभाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना दिसले. त्यांनी ही माहिती मॅनेजरला दिली. हॉटेलमध्ये नियुक्त फायरमनने पाण्याचा मारा केला. महापलिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंबदेखील दाखल झाले; परंतु त्यांचा काहीही फायदा झाला नाही. सिटी कोतवालीचे वरिष्ठ ठाणेदार शिवाजी बचाटे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाकगृहात आग लागल्याची व ती धुरांड्यातून वर पोहोचल्याची माहिती बचाटे यांनी दिली. हॉटेलचे संचालक गोपाल मुदंडा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अग्निशमन बंबाला अपघातदरम्यान, अग्निशमन दलाचे एमएच २७ एक्स २०३० क्रमांकाचे वाहन हॉटेलच्या तळाशी असलेल्या पार्किंगमध्ये जात असताना उतरावरून काही फुटांवर असलेल्या हॉटेलच्या मुख्य पाइप लाइन व डक्टिंगला धडकले. यावेळी तेथे कुणी नसल्याने अनर्थ टळला. या अपघातात कंत्राटी चालक संजय चव्हाण हे जबर जखमी झाले. त्यांना वाहनातून काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहनाचे ब्रेक फेल झाले की नियंत्रण सुटले, हे स्पष्ट झाले नाही.