वनोजा बाग : एमआयडीसी परिसरात असलेल्या विजेचे ट्रान्सफाॅर्मर बनविणाऱ्या कंपनीला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, याच रात्री कधी नव्हे इतक्या विजांचा गडगडाट होऊन मुसळधार पाऊससुद्धा बरसला. नेमकी ही आग कशामुळे लागली, हे कारण समजू शकले नाही.
स्थानिक एमआयडीसी परिसरात इम्रान खान रशीद खान यांची विजेचे ट्रान्सफार्मर बनविण्याची हिंदुस्थान पॉवर सप्लाय ही आस्थापना आहे. सोमवारी सर्व कामगार रात्री साडेआठ वाजता कंपनी बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अचानक या टिनाच्या शेडमधील कंपनीला आग लागली. यात ४५ तयार
ट्रान्सफाॅर्मर व सुमारे ऐंशी ट्रान्सॅफार्मरचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुमारे पंचाहत्तर ते ऐंशी लाखांच्या घरात नुकसान असल्याचे कंपनी मालकांनी सांगितले. अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत सर्व साहित्य जळाले होते.