शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ आग लागली नाही; लावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

सहा अग्निशामक वाहने व शहरातील पाण्याचे टँकर यांच्या साहाय्याने शुक्रवारी तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आली. तहसील प्रशासनाने ३३ दुकानांचे स्वतंत्र पंचनामे केले. आगीत सर्वस्व गमावलेल्या ३३ दुकानदार व त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी आपआपल्या दुकानात जाऊन काही वाचले का, याची चाचपणी केली. दुकानातील साहित्यासह अन्य सामग्री व महत्त्वाचे दस्तावेज जळाल्याने उभे राहायचे कसे, अशा विवंचनेत शनिवारी दुकानदारांनी जळालेले साहित्य उचलणे सुरू केले.

ठळक मुद्देदुकानदारांचा आरोप : पोलिसांत तक्रार, अग्नितांडवाला वेगळे वळण

  लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरात शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास लागलेल्या आगीत ३३ दुकाने जळून खाक झाली. दुकानदारांचे अंदाजे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले. ती आग शॉर्ट सर्कीटने नव्हे, तर हेतुपुरस्सर लावल्याची तक्रार स्थानिक पोलिसांत शनिवारी करण्यात आली. तक्रार अर्जाच्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी आरंभली आहे. सहा अग्निशामक वाहने व शहरातील पाण्याचे टँकर यांच्या साहाय्याने शुक्रवारी तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आली. तहसील प्रशासनाने ३३ दुकानांचे स्वतंत्र पंचनामे केले. आगीत सर्वस्व गमावलेल्या ३३ दुकानदार व त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी आपआपल्या दुकानात जाऊन काही वाचले का, याची चाचपणी केली. दुकानातील साहित्यासह अन्य सामग्री व महत्त्वाचे दस्तावेज जळाल्याने उभे राहायचे कसे, अशा विवंचनेत शनिवारी दुकानदारांनी जळालेले साहित्य उचलणे सुरू केले. तेथे त्यांना काही संशयास्पद परिस्थिती आढळून आली. परिणामी सर्व पीडित व्यापाऱ्यांनी धारणी पोलीस ठाणे गाठून आग लावणारा शोधून काढून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कमाईची राखरांगोळीशुक्रवारी लागलेल्या आगीत ३३ दुकानदारांचे प्रचंड नुकसान झाले. या सर्वच व्यापाऱ्यांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा आहेत. शनिवारी दुकानातील जळालेले साहित्य ते उचलत होते. आता साधनसामग्रीही नाही, अन् दुकानही नाही, नवीन व्यवसाय कसा उभारावा, अशी व्यथा सांत्वनेसाठी येणाऱ्यांकडे मांडत होते. इतक्या वर्षांच्या कमाईची राखरांगोळी झाली असल्याने नवीन व्यवसाय उभारणे शक्यच नसल्याची भावना बहुतांश दुकानदारांनी व्यक्त केली. 

नगरपंचायतकडून मिळाल्या होत्या नोटीसयेथील सर्वे क्रमांक १२६ लगत ही सर्व दुकाने होती. त्यातील काही व्यापाऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जागेचे पट्टे मिळाले होते. ते पट्टे अनधिकृत असल्याची ओरड होती. काही दिवसांपूर्वी या दुकानधारकांना कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात नगरपंचायतने नोटीससुद्धा बजावल्या होत्या. 

शुक्रवारची आग शॉर्ट सर्कीटने  लागली नसून, ती कोणी तरी लावली असल्याचा तक्रार अर्ज व्यापाऱ्यांनी दिला आहे. दोन दिवसांत चौकशी पूर्ण करण्यात येईल. तसे आढळल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल. - निकेतन कदम, ठाणेदार, धारणी

टॅग्स :fireआग